प्रतिनिधी-सुरंजन काळे घोडेगाव(ता.आंबेगाव) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (एन.एम.एम. एस. )2024 मध्ये आंबेगाव तालुक्यातील आ...
प्रतिनिधी-सुरंजन काळे
घोडेगाव(ता.आंबेगाव) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (एन.एम.एम. एस. )2024 मध्ये आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील रयत शिक्षण संस्थेच्या भिमाशंकर विद्यामंदिर शिनोली विद्यालयाच्या 31 पैकी 14 विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यापैकी श्री राजेंद्र शिंदे व कु. सिद्धी राजू भारमळ या दोन विद्यार्थ्यांची एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे त्यांना प्रतिवर्षी 12000/- प्रमाणे एकूण 4 वर्षे प्रत्येकी 48000/- रुपये शिष्यवृत्ती मिळेल. तसेच सारथी शिष्यवृत्तीसाठी विद्यालयातील आराध्य भरत गायकवाड, कु. तन्वी राहुल शेळके,कु.श्रावणी जयदीप बोऱ्हाडे ,युगांत योगेश बोऱ्हाडे,कु. समीक्षा अनिल वरे या विद्यार्थ्यांची निवड झाली. असून त्यांना प्रतिवर्षी 9600/- प्रमाणे 4वर्षे प्रत्येकी 38,400/- शिष्यवृत्ती मिळेल. या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे विभागप्रमुख मोरे व्ही.एम व विषयशिक्षक आर.एस.पिंगळे,ई.टी.लाडके, आर.डी.भालचिम या सर्वांचे विद्यालयाचे प्राचार्य ए.डी.अभंग व पर्यवेक्षिका अंजली वाळुंज यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य श्री.ए.डी. अभंग यांनी सर्व मार्गदर्शक व विद्यालयाचे कौतुक करून अभिनंदन केले व विद्यालयाची गुणवत्तेची परंपरा अशीच पुढे चालू राहण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करावा असे मार्गदर्शन केले.
COMMENTS