नागपूर: चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. अर्चना राहुले (वय ५०) असे हत्या झा...
नागपूर: चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. अर्चना राहुले (वय ५०) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती डॉ. अनिल राहुले आणि दीर रवी राहुले अशी आरोपींची नावे आहेत.
या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
डॉ.अर्चना राहुले या मेडिकल रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या. तर आरोपी पती डॉ. अनिल (वय 52) हा छत्तीसगड-रायपूर येथे वैद्याकीय महाविद्यालयात डॉक्टर आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचे हातपाय बांधून ठेवले, तर त्याच्या भावाने डोक्यावर रॉड मारला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, मृत महिलेला एक मुलगा असून तो तेलंगणा राज्यात करीमनगर येथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर महिलेची हत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
COMMENTS