भारतातील क्रीडा व आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या इंडो ॲथलेटिक सोसायटी तर्फे आज दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता इंडो अथलेटिक सोसाय...
भारतातील क्रीडा व आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या इंडो ॲथलेटिक सोसायटी तर्फे आज दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता इंडो अथलेटिक सोसायटीच्या ऑफिसमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या सहकार मी फाउंडेशनच्या मस्ती की पाठशाला या शाळेतील बांधकाम व वीट भट्टी कामगारांच्या मुलांसाठी सायकल डोनेशन प्रोग्राम घेण्यात आला. संस्थेतर्फे दर सहा महिन्याला असा प्रोग्राम घेतला जातो असे इंडो ॲथलेटिक सोसायटीतर्फे सांगण्यात आले.
रनिंग ट्रेकिंग स्विमिंग व सायकलिंगची आवड जपत अनेक सामाजिक उपक्रम करणाऱ्या आज मस्ती की पाठशाळेच्या पाच मुलांना या उपक्रमात सायकल भेट देण्यात आल्या. सगळ्या सायकलींना छान फुलांचे हार घालण्यात आले होते. मुलांना इंडो ॲथलेटिक सोसायटीचे टीशर्ट भेट देण्यात आले. त्यामुळे आमची मुलं इंडो ॲथलेटिकच्या परिवारात अगदी सहजरीत्या सामावून गेली.
इंडो ॲथलेटिक सोसायटीच्या सदस्यांना सुधीर कारंडे सरांनी मस्ती की पाठशाळे विषयी माहिती दिली तसेच मुलांचेही मनोगत सगळ्यांसमोर सादर करण्यात आले. त्यानंतर मुलांना सायकल देण्यात आल्या. सायकल मिळणार म्हणून सकाळी लवकर उठून तयार झालेल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. पिंपरी चिंचवड शहरात पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्याचा आलेल्या या कामगारांचा खूप खडतर प्रवास असून या सायकल डोनेशन मुळे मुलांना शाळेत जाण्यासाठी सगळ्यात मोठी मदत होणार आहे असे सहगामी फाउंडेशनच्या प्रमुख प्राजक्ता रुद्रवार यांच्यातर्फे सांगण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सदस्य मारुती विधाते यांच्यातर्फे पंढरपूर सायकल वारीला दहा हजार रुपयांचा चेक देण्यात आला.
आज या उपक्रमाच्या माध्यमातून मस्ती की पाठशाळेतील विद्यार्थ्यांना सायकली भेट दिल्याबद्दल इंडो ॲथलेटिक सोसायटीतचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ यांचे मनःपूर्वक आभार तसेच या उपक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल गिरीराज उंमरीकर, अजित गोरे, अमृता पाटील, रवींद्र पाटील, अविनाश चौगुले, निकिता चौगुले, अजित गोरे, अमित पवार प्रणव कडू, कैलासशेठ तापकीर, मारुती दवणे, श्रीकांत चौधरी, मदन शिंदे, किरण भावसार, रमेशजी माने सर्वांचेही संस्थेतर्फे आभार मानण्यात आले.
COMMENTS