प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर बुधवार दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उच्छिल ता.जुन्नर जि.पुणे येथे क्लीन एनर्जी एक...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
बुधवार दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उच्छिल ता.जुन्नर जि.पुणे येथे क्लीन एनर्जी एक्सेस प्रोग्राम अंतर्गत ॲप्टीव्ह कंपोनेंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अर्थसाहाय्यातून व श्री.शक्ती कोंशियसनेस फांऊडेशन ( एस.एस.सी.एफ.) आय. आय. ई. सी. इंडिया गुरुग्राम हरियाणा यांच्या माध्यमातून सोलर प्लांट लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानीं मा.श्री.विठ्ठलराव भोईर सो. गटविकास अधिकारी पंचायत समिती,जुन्नर हे होते.कंपनीच्या वतीने श्री.अमरनाथ यादव प्रशासन अधिकारी आय. आय. ई. सी. दिल्ली, श्री.अनंत जोशी प्रोजेक्ट मॅनेजर आय. आय. ई. सी. दिल्ली व ज्यांच्या माध्यमातून एन.जी.ओ. सी.एस.आर. फंडातून जुन्नर तालुक्यातील विविध शाळांचा भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे असे खामगाव शाळेचे आदर्श शिक्षक श्री. अंकुशराव कोकणे तर ॲप्टीव्ह कंपनीचे प्रतिनिधी श्री.संकेत जाधव व श्री.सागर वाव्हळ श्री.सुमित सर आय. आय. ई. सी. यांचे प्रतिनिधी, श्री.तुषार बिनवडे समन्वयक आय. आय. ई. सी. दिल्ली श्री.मनिष सहरावत जियोनवट एनर्जीं प्रायव्हेट लिमिटेड, श्री. तुकाराम लोहकरे पेसा समन्वक जुन्नर , उच्छिल केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. पुष्पलता पानसरे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
ॲप्टिव्ह कंपोनेंटस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व श्री. शक्ती कोशियसनेस फाउंडेशन (एस एस सी एफ) यांच्या माध्यमातून जि. प.प्राथ.शाळा उच्छिल, सुराळे, शिवेचीवाडी( खामगांव), गोद्रे,पांगरी तर्फे ओतूर व उदापूर या सहा शाळांचे सोलर प्लॉन्ट हस्तांतर सोहळा मान्यवरांच्या हस्ते झाला.
या प्रसंगी गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर यांनी सांगितले की, जुन्नर तालुक्यातील आदिवासी व दुर्गम आणि जेथे गरज असेल अशा भागातील विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करून तुमच्या सारखी माणसे देशाचे भविष्य या शैक्षणिक प्रक्रियेद्धारे स्थापित करत असताना डिझीटल तंत्रज्ञान या प्रणालीद्वारे विकसित होत आहे. आज आपल्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे. ग्रामीण भागातील या सर्व जिल्हा परिषद शाळांकरीता अत्यंत उपयुक्त असा प्रकल्प राबविल्याबद्दल व भविष्यात विविध ठिकाणी असा उपक्रम राबविल्यास आम्हास आपला सार्थ अभिमान असेन. असे प्रतिपादन केले.
आय. आय. ई. सी. दिल्ली यांचे प्रशासन अधिकारी श्री.अमरनाथ यादव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी इमारती उभ्या करून भौतिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत तर सोलर प्लॉन्ट जुन्नर तालुक्यातील यापूर्वी पाच शाळा व आज सहा शाळा पूर्ण झाल्या आहेत. भविष्यात इतर ठिकाणीही आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त शालेय व्यवस्थापन समितीचे मा. अध्यक्ष शरद नवले, सरपंच मंगेश आढारी, सुराळे शाळेचे मुख्याध्यापक खंडेराव ढोबळे, हनुमंत गोपाळे यांनी व्यक्त केल्या. कंपनीना आपल्या परिघाबाहेर थोडेसे बाहेर येऊन ग्रामीण भागातील शाळांकरीता काम करा असे आवाहन सौ. पुष्पलता पानसरे यांनी केले आहे. या कार्यक्रमानंतर कंपनीच्या वतीने सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन नवले, पोलिस पाटील सुनिल बगाड, तंटामुक्ती मा.अध्यक्ष आत्माराम शिंदे, बापू नवले, गोद्रे गावचे मा.सरपंच भिमाजी उतळे, मुख्याधापक दत्तात्रय ठोंगिरे, मानिक फापाळे, तुकाराम हगवणे, सुनिल चौधरी, चौधरी मॅडम व सत्यवान मस्के आणि पंढरीनाथ उतळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उच्छिल गावचे उपसरपंच मारुती खिलारी, ग्रामपंचायत सदस्य दशरथ नवले, शंकर आढारी, शालेय व्यवस्थापन समिती जयराम नवले, कांचन नवले, गणपत भालेराव, देवेश नवले, शिवाजी नवले, निलेश नवले, साहिल केंगले, कांचन नवले व आश्विनी साबळे, साहिल केंगले, विमलबाई करवंदे आणि हिराबाई नवले आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुभाष मोहरे यांनी केले,मानवरांचे स्वागत सौ स्मिता ढोबळे तर नियोजन आरती मोहरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उच्छिल शाळेचे मुख्याध्यापक श्री अन्वर सय्यद यांनी केले. उपस्थितांचे आभार श्री आनंदा मांडवे यांनी मानले.
🙏🙏🙏🙏🙏🙏
COMMENTS