प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर शिनोली तालुका आंबेगाव येथील श्री साबाजीबुवा यात्रेत सालाबादप्रमाणे गंगापूर बुद्रुक येथील ऋणानुबंध संस्था ...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
शिनोली तालुका आंबेगाव येथील श्री साबाजीबुवा यात्रेत सालाबादप्रमाणे गंगापूर बुद्रुक येथील ऋणानुबंध संस्था व भैरवनाथ नाटय मंडळ च्या सुत्रधार अनिल ठोसर व राजु गुंजाळ लेखक दिग्दर्शक असलेले आणि रमेशभाऊ येवले व नित्यानंद येवले निर्मित तमाशा एक रांगडी गंमत वगनाट्य भ्रष्टाचार या संगीतनृत्य व सामाजिक विषयावरील नाटकाचा खेळ सादर झाला, ज्याला शेकडो नाट्यरसिकांची दाद मिळाली,शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवत मनोरंजनातुन समाजप्रबोधन साधत नाट्य मंडळाने प्रेक्षकांची मने जिंकली.
नाटाच्या कार्यक्रमास प्रमुख ऊपस्थित ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक रामदास काळे, आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्हाप्रमुख प्राध्यापक अनिल निघोट यांनी शुभेच्छा दिल्या. तर सुत्रधार अनिल ठोसर यांनी प्रस्तावना तर दिग्दर्शक लेखक राजेंद्र गुंजाळ यांनी कलाकार परीचय व महाराष्ट्र राज्य लावणी महासंघ अध्यक्ष संतोष लिंभोरे यांनी बहारदार निवेदनातून नाट्यपरीचय केला. ड्रेपरी ज्ञानेश्वर वाघ,मेकअप अभय शिंदे यांनी केला.
नाट्यकलाकार अशोक नरवडे यांनी शिवरायांची महती आपल्या हाडी आवाजात सादर केली तर यांची शिवगर्जना शिवप्रेमींची दाद मिळवुन गेली.
तमाशा एक रांगडी गंमत भ्रष्टाचार नाटकाचे कलावंत अर्जुन नरवडे,राजु गुंजाळ, अशोक नरवडे,वसंत येवले,चंद्रकांत ठोसर,रामकृष्ण शेंडे,उल्हास गुंजाळ, दशरथ नरवडे,आकांक्षा नरवडे,गोरक्षनाथ साबळे,अक्षय साबळे,यश फदाले,बाळासाहेब रणदिवे यांनी आपल्या बहारदार अभिनयाने नाट्यरसिकांची वाहवा मिळवली. नृत्यांगना सोनी भोसले, चांदणी देशमुख, स्नेहा वेदिका यांनी आपल्या नृत्याविष्काराने रसिकांना मोहुन टाकले.
साबाजीबुवा यात्रा कमेटी व ग्रामस्थांनी ऊत्तम व्यवस्था ठेवली होती.
COMMENTS