सातारा (वार्ताहर )-कराड येथील पत्रकार आणि दैनिक क्रांतिकारी जयभीम चे संपादक विश्वास मोहिते यांना मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने...
सातारा (वार्ताहर )-कराड येथील पत्रकार आणि दैनिक क्रांतिकारी जयभीम चे संपादक विश्वास मोहिते यांना मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण 25 एप्रिल 2025 रोजी कराड येथील भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय तडाके यांनी दिली आहे.
मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान गेली कित्येक वर्ष सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय असून दिन, दलित, पदलित वंचित घटकांना मदतीचा हात पुढे केलेला आहे. तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेचे सन्मान ही यापूर्वी केले आहेत. चालू वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थेचा सन्मान विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातला पुरस्कार कराड तालुक्यातील, सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवरती निर्भीडपणे लेखन करून बहुजन, वंचित समाजाला दिशा देण्याचे आणि अन्यायविरुद्ध आवाज उठवण्याचे सातत्याने काम करणाऱ्या कराड येथील क्रांतिकारी जयभीम दैनिकाचे संपादक विश्वास मोहिते यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण 25 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता वेणूताई चव्हाण सामाजिक सभागृह शिवाजी स्टेडियम जवळ शनिवार पेठ कराड या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे असेही संजय तडाखे यांनी सांगितले
COMMENTS