पुणे शहरामध्ये एका मैत्रिणीनेच तिच्या जिवलग मैत्रिणीच्या कोल्ड कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकून 6 लाख रुपयांचे दागिने दागिने चोरल्याची घटना काह...
पुणे शहरामध्ये एका मैत्रिणीनेच तिच्या जिवलग मैत्रिणीच्या कोल्ड कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकून 6 लाख रुपयांचे दागिने दागिने चोरल्याची घटना काही दिवसांपूर्वी आंबेगावमध्ये घडली होती.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत ऐश्वर्या संजय गरड (25) या युवतीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना 6 मार्च रोजी संध्याकाळी 4 वाजता पुण्यातील सिंहगड कॉलेजजवळ असलेल्या एमराईड सोसायटीमध्ये घडली. फिर्यादी युवती ही तिच्या घरी असताना तिची मैत्रीण घरी आली. यावेळी तिने येताना कोल्ड कॉफी सोबत आणली आणि ती तिने मैत्रिणीला पिण्यासाठी दिली. मैत्रिणीने आणलेली कोल्ड कॉफी कुठला ही विचार न करता फिर्यादी युवतीने प्यायली. दरम्यान, याच कोल्ड कॉफीमध्ये आरोपी तरुणीने गुंगीचे औषध मिसळले होते. गुंगीचे औषध मिळाल्यामुळे फिर्यादी या बेशुद्ध पडल्या. याचाच फायदा मैत्रिणीने घेतला आणि थेट बेडरूममध्ये जाऊन कपाटाचे ड्रॉव्हर मधील 5 लाख 46 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून तिने तिथून पळ काढला.
फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची चौकशी मैत्रिणीकडे केल्यावर आपणच तिच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली आणि दागिने परत करते असे आश्वासन दिले. मात्र, वारंवार विचारून सुद्धा मैत्रिणीने दागिने परत न दिल्यामुळे युवतीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मधील कर्मचारी आरोपी युवतीचा शोध घेत असताना ही युवती पुणे स्टेशन येथे असल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले व तिच्याकडून फिर्यादी यांचे चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, (अतिरिक्त कारभार) मनोज पाटील, पोलिस उप आयुक्त परिमंडळ २, स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारती विदयापीठ पोलिस स्टेशन कडील सावळाराम पु. साळगांवकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भाबड, पोलिस उप निरीक्षक निलेश मोकाशी, प्रियांका निकम व पोलिस अंमलदार किरण देशमुख, राहुल शेडगे, नरेंद्र महांगरे, महेश बारवकर मंगेश पवार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, तुकाराम सुतार व महीला पो.अंमलदार सोनाली गावडे, चंदन रसाळ, प्रज्ञा निंबाळकर यांच्या पथकाने केली आहे.
COMMENTS