प्रतिनिधी : सुरंजन काळे घोडेगाव विविध कार्यकारी सोसायटी घोडेगाव क्र१ विविध कार्यकारी सोसायटीच्या शेतकरी सभासदांना पीक कर्ज वाटपाचा शुभारंभ ...
प्रतिनिधी : सुरंजन काळे
घोडेगाव विविध कार्यकारी सोसायटी घोडेगाव क्र१ विविध कार्यकारी सोसायटीच्या शेतकरी सभासदांना पीक कर्ज वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोडेगाव विभागात खरीप हंगामाच्या पीक कर्ज वाटपास सोमवार (ता. ७) सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्हा बँकेचे घोडेगाव शाखा विकास अधिकारी व आंबेगाव तालुका देख-रेख संघाचे अध्यक्ष श्री सखाराम हरिभाऊ काळे पाटील तसेच आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री तुकाराम नामदेवराव काळे पाटील तसेच घोडेगाव क्रमांक एक विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश शेठ काळे पाटील श्री गोविंदराव भास्कर दशरथ काळे डॉक्टर केशवराव काळे श्री युवराज काळे यांच्या हस्ते यावेळी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले. घोडेगाव विविध कार्यकारी सोसायटी व घोडेगाव क्रमांक एक विविध कार्यकारी कार्यकारी सोसायटी या दोन्ही संस्थेचे कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे कर्जाचे वाटप देखील मोठ्या प्रमाणावर होत असते घोडेगाव क्रम घोडेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने 344 सभासदांना एकूण कर्ज वाटप दोन कोटी तीस लाख तसेच घोडेगाव क्रमांक एक विविध कार्यकारी सोसायटीने 344 सभासदांना सभासदांना दोन कोटी 15 लाख इतके वाटप केले असल्याचे संस्थेचे सचिव श्री निलेश रघुनाथ झोडगे यांनी माहिती दिली.
COMMENTS