प्रतिनिधी : पंकज सरोदे भारतीय बौद्ध महासभा महिला व पुरुष विभाग आंबेगाव तालुक्याच्या वतीने सम्राट अशोक यांची 2329 वि जयंती मोठ्या उत्साहाने स...
प्रतिनिधी : पंकज सरोदे
भारतीय बौद्ध महासभा महिला व पुरुष विभाग आंबेगाव तालुक्याच्या वतीने सम्राट अशोक यांची 2329 वि जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी बौद्धजण सेवा संघ, भीम जयंती महोत्सव संस्था, वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुका या संस्था सहभागी झाल्या होत्या यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महेशजी वाघमारे तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे होते. चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जिवन पाटावर प्रवचनकर गणेश वाघमारे यांनी मार्गदर्शन केले त्यात लोकशाही राज्य निर्माण करणारे प्रथम राजा म्हणजे सम्राट अशोक होय.त्यांनी संपूर्ण आशिया खंड हे त्यांचे राज्य होते त्यात भारत पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ,बांगलादेश, भूतान, इराण, तुर्कस्तान, ताजीकीस्थान ईत्यादी देशावर राज्य कारणाने एकमेव राजा म्हणजे सम्राट अशोक होय. त्यांनी कलिंग युद्ध जिंकल्यावर झालेल्या हानी पाहून त्यांनी बौद्ध धर्माचा स्विकार केला. आपली मुलगी संघमित्रा व महेंद्र याना श्रीलंका या ठिकाणी बौद्ध धर्म प्राचार व प्रसाराचे काम त्यांना दिले.राज्यात रस्ते तयार करणे रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे,पाणपोई निर्माण करणे, कालवा निर्माण करणे, वन विभाग,विश्रामगृह, चुकी मान्य करणे व त्यास माफी देणे,जनतेच्या खुशाली तपासण्यासाठी अधिकारी नेमणूक करणे, राज्याची जनगणना करणे, वैद्यकीय सुविधा पुरविणे,जनतेला धार्मिक स्वातंत्र्य देणे, विदेश विभाग निर्माण करणे, वृध्द माता पिता सांभाळ योजना, उद्योग व्यापार निर्माण करणे, लेणी तयार करणे, पशू हत्या बंदी कायदा करणारे सम्राट, शेतीला व्यावसायिक दर्जा देणे, प्रशासकीय अधिकारी यांची दर 5 वर्षानी बदली, रोजगार निर्मिती करणे, आसे जनतेचे हित पाहणारा राजा म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोक हे होते. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष महेशजी वाघमारे यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले.
यावेळी शशीकांत भालेराव, विकास मोरे,गजानन राजगुरू, शिवाजी राजगुरू, विनोद राजगुरू,जनताई राक्षे, मीनाक्षी वाघमारे यांनी सर्वाना जयंती निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी अनिल अभंग, सागर गायकवाड, तानाजी असावरे,पंकज सरोदे,गणेश भालेराव, राजू शेवाळे ,गौतम खले, सुरेश शिंदे, जया भालेराव, सुशीला वाघमारे खले ताई वसंत वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन ढोणे यांनी केले तर आभार अनिल अभंग यांनी मानले.
COMMENTS