घोडेगाव प्रतिनिधी : सुरंजन काळे आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इ. ६वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांसाठ...
घोडेगाव प्रतिनिधी : सुरंजन काळे
आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इ. ६वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसांच्या उन्हाळी शिबिराचे आयोजन दि.०८/०४/२०२५ व ०९/०४/२०२५ करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, दैनंदिन जीवनामध्ये असणारा विज्ञानाचा वापर, विज्ञान विषयांबरोबर भविष्यात उपलब्ध असणारे शैक्षणिक पर्याय, तसेच मॉडेल मेकिंग इत्यादी गोष्टींचा समावेश या दोन दिवसाच्या शिबिरामध्ये करण्यात आला होता या शिबिरास प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून आयुका पुणे येथील श्री. रुपेश लबडे हे उपस्थित होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री तुकाराम काळे व विद्यालयाचे चेअरमन श्री बाळासाहेब काळे विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मेरी फ्लोरा डिसोजा, उपप्राचार्या रेखा आवारी, विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कु.अनुष्का लांघी व कु.अस्मि राऊत यांनी केले.शाळेचे चेअरमन मा. बाळासाहेब काळे सर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे Project associated IUCAA Pune श्री. रुपेश लबडे, संस्थेचे अध्यक्ष विद्यालयाचे चेअरमन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.
श्री.रुपेश लबडे सर यांनी विद्यार्थ्यांना दोन दिवसात होणाऱ्या शिबिराबद्दल तसेच आयुका केंद्राबद्दल व इयत्ता दहावी नंतर विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्र या विषयाचा अभ्यास कसा करावा याबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तल्लख बुद्धिमत्ता आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनियर यापेक्षाही वैज्ञानिक संशोधनामध्ये आपले आपली बुद्धिमत्ता वापरली तर त्याचा समाजास व आपल्या देशात खूप फायदा होईल, असे प्रतिपादन श्री रुपेश लबडे यांनी वैज्ञानिक संशोधन हा देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी उत्तम पर्याय आहे. असेही ते या शिबिरात पहिल्या दिवशी पाच प्रकल्प व दुसऱ्या दिवशी पाच असे दहा प्रकल्प विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले . त्यामध्ये Kaleidoscope, Newton disc, sundial, bernoullis principle यांसारखे प्रकल्प तयार करून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.दुसऱ्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला दुर्बिणीद्वारे सूर्य स्पॉट दाखवण्यात आला .विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे शिबिर पूर्ण केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री तुकाराम काळे,उपाध्यक्ष एडवोकेट श्री. संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष श्री सुरेश शेठ काळे, संस्थेचे सचिव श्री विश्वास काळे, जॉईंट सेक्रेटरी श्री प्रशांत काळे, समन्वय समिती चेअरमन श्री राजेश काळे, संस्थेचे खजिनदार श्री सोमनाथ काळे,वस्तीगृह कमिटीचे चेअरमन श्री सूर्यकांत गांधी, संचालक श्री अजित काळे व श्री अक्षय काळे यांचे योगदान लाभले. तसेच शाळेतील विज्ञान शिक्षक श्री.कैलास जाधव, सौ.हुदा शेख, श्रीमती सुषमा थोरात, सौ स्मिता पवळे, सौ ज्योती रोकडे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
COMMENTS