जबलपूर (मध्य प्रदेश): जबलपूरमध्ये बोकडाचा बळी देण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृ...
जबलपूर (मध्य प्रदेश): जबलपूरमध्ये बोकडाचा बळी देण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे बळी देण्यासाठी नेत असलेला बोकड अपघातातून बचावला आहे.
जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या चारगव्हाण-जबलपूर रस्त्यावर शुक्रवारी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान हा अपघात झाला. या गाडीत पटेल कुटुंबातील सहा सदस्य होते, जे नरसिंहपूर येथील दादा दरबारात प्रतीकात्मकपणे बोकड आणि कोंबडी अर्पण केल्यानंतर जबलपूरला परतत होते. घरी आल्यानंतर, कुटुंब चिकन आणि बोकडाचे मटण शिजवून एक कार्यक्रम आयोजित करणार होते.
वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर एसयूव्ही रेलिंग तोडून नदीच्या पात्रात पडली. अपघाताची माहिती मिळताच, चारगव्हाण पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमी आणि मृतदेह बाहेर काढले. गाडी खाली पडल्यामुळे तिचा चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे जखमी आणि मृतदेह बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत होत्या. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. किशन पटेल (वय 35), महेंद्र पटेल (वय 35), सागर पटेल (वय 17) आणि राजेंद्र पटेल (वय 36) यांचा जागीच मृत्यू झाला. जितेंद्र पटेल (वय 36) आणि मनोज प्रताप (वय 35) हे दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, गाडीत एक कोंबडी आणि एक बोकड देखील होती. पटेल कुटुंब पूजेनंतर बळी देण्यासाठी त्यांना घेऊन जात होते. अपघातात कोंबडीचा मृत्यू झाला, तर बोकडाचा कान कापला गेला, पण बोकड अपघातातून बचावला आहे. या अपघाताबाबत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS