प्रतिनिधी : सुरंजन काळे घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील गौरी युवराज काळे या विद्यार्थिनीने ओलंपियाड परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक मिळवला असल्याच...
प्रतिनिधी : सुरंजन काळे
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील गौरी युवराज काळे या विद्यार्थिनीने ओलंपियाड परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक मिळवला असल्याचे प्राचार्य मेरीफ्लोरा डिसोझा यांनी सांगितले. ओलंपियाड परीक्षेच्या दुसऱ्याफायनल राउंड मध्ये इयत्ता सातवीमध्ये असलेली गौरी काळे हिने चौथा क्रमांक मिळवला असून तिला एक हजार २०० रूपयांची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. तसेच इयत्ता तिसरीमध्ये असलेली दिव्यांका नरेंद्र काळे व इयत्ता नववीतील ओम मेहेर या विद्यार्थ्यांनी देखील इंटरनॅशनलस्पर्धा परीक्षेत उत्तम कामगिरी केली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे आंबेगाव तालुका विदया विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे, उपाध्यक्ष अॅड. संजय आर्विकर, सचिव विश्वास काळे, सोमनाथ काळे, प्राचार्या मेरीफ्लोरा डिसोझा, उपप्राचार्या रेखा आवारी आदींनी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व विदयार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS