बीडः नवविवाहित दाम्पत्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने केतुरा परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीने बुधवारी (ता. २) गळफास घेऊन आत्महत्या ...
बीडः नवविवाहित दाम्पत्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने केतुरा परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीने बुधवारी (ता. २) गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर पतीने आज (गुरुवार) झाडाला गळफास घेतला आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
अक्षय गालफाडे आणि शुभांगी गालफाडे असे आत्महत्या केलेल्या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. महिनाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यानंतर दोघेही पुण्याला राहत होते. लग्नानंतर काही दिवस सुखाने संसार सुरू होता. मात्र त्यानंतर सातत्याने होणाऱ्या कौटुंबिक वादानंतर त्यांनी पुन्हा आपले गाव गाठले.
पण, गावात आल्यानंतरही दोघांमध्ये वाद होत राहिले. शुभांगीने आत्महत्या केल्यानंतर शुभमने पहाटेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली आहे. अक्षयच्या आत्महत्येची बातमी ज्यावेळी कुटुंबियांनी कळली, त्यावेळी त्याच्या आईने टाहो फोडला. दोघांच्या आत्महत्येने मात्र परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
COMMENTS