गंगापुर बुद्रुक दि.१ एप्रिल आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील गंगापूर बुद्रुक गावात मुक्तादेवी कमलजामाता यात्रेनिमित्त भव्य आखाडा आखाडय...
गंगापुर बुद्रुक दि.१ एप्रिल आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील गंगापूर बुद्रुक गावात मुक्तादेवी कमलजामाता यात्रेनिमित्त भव्य आखाडा
आखाडयास शिवसेना महिला आघाडीच्या प्रा.सुरेखाताई निघोट, आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्हाप्रमुख प्रा अनिल निघोट यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुलींची कुस्ती सुरेखाताई निघोट यांच्या हस्ते लावण्यात आली. दानशूर ग्रामस्थांनी कुस्तीत सहभागी पहिलवानांसाठी विक्रमी पन्नास ढाली ,चांदीची गदा व हजारो रुपयांचे ईनाम ठेवल्याबद्दल आखाडयास आलेल्या पहिलवानांनी समाधान व्यक्त केले. डोंगरगण,तोरणे, शिरुर, हिवरेबाजार असे लांबचे पहिलवान आखाडयात सहभागी झाले होते.
आबालवृद्ध, महिलाभगिनी व कुस्ती शौकिनांनी रसिकांनी गंगापूर यात्रा कमेटी अध्यक्ष शहाजी येवले सरपंच मंगल केदारी, उपसरपंच संदीप येवले बजरंग लोहोट,धनंजय येवले, सुभाष लोहोट, संजय लोहोट, धनंजय लोहोट,प्रविण येवले,तुकाराम केदारी,योगेश जाधव, प्रल्हाद येवले, विश्वनाथ लोहोट, सतीश लोहोट, सिताराम आवटे, निलेश येवले, बाळासाहेब आवटे, अमोल लोहोट, चिमाजी मधे,बाळासाहेब लोहोट,प्रशांत साबळे,सतिश लोहोट, किरण लोहोट,अमोल लोहोट,पांडरंग राऊत,वसंत वारे,बाळासाहेब केदारी, श्रीराम येवले, मंगेश लोहोट, विलास येवले यांनी ऊत्तम नियोजन व व्यवस्था पाहिली. पंच म्हणून पैलवान सिताराम लोहोट, यमनाजी लोहोट, प्रवीण येवले,मुरलीधर लोहोट यांनी काम पाहिले. तर अक्षय मुळुक यांनी समालोचन केले किरण लोहोट, मंगेश लोहोट, विदयाधर यांनी गुणलेखक म्हणून काम केले.
COMMENTS