प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,पॉलिटेक्निक चे प्रा.अनिल कपिले,लॉ कॉलेज चे प्राचार्य डॉ.सुनील कवडे,प्रा.शिवाजी कुमकर,प्रशासकीय अधिकारी,प्रा.प्रदीप गाडेकर,रासेयो अधिकारी प्रा.दिनेश जाधव,प्रा.भूषण दिघे,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.गणेश बोरचटे,प्रा.निलेश नागरे,प्रा.निलेश गावडे,ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर,सर्व विभागाचे प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आधुनिक भारताचे निर्माते आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस १४ एप्रिल भारतासह जगभरातल्या अनेक देशात साजरा केला जातो.या दिवसाला ‘समता दिन’ आणि ‘ज्ञान दिन’ म्हणूनही साजरा करण्यात येतो,कारण जीवनभर समानतेसाठी संघर्ष करणारे प्रतिभाशाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ‘समतेचे प्रतिक’ आणि ‘ज्ञानाचे प्रतिक’ सुद्धा म्हटले जाते.बाबासाहेब जगात त्यांच्या मानवी हक्कांचे आंदोलन,भारतीय संविधान निर्मिती आणि त्यांच्या विद्वत्तेसाठी ओळखले जातात आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस ‘आंबेडकर जयंती’ ही त्यांच्या प्रति आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो असे उद्गार संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी काढले.विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी अखंडपणे ज्ञान अवगत करतांना सातत्यपूर्ण,जिद्द आणि चिकाटी मनात ठेवून आपले इप्सित ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करावा असे यावेळी डॉ.लक्ष्मण घोलप म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा.गणेश नवले यांनी तर आभार प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी मानले.
COMMENTS