प्रयागराज (उत्तर प्रदेश): एका व्यावसायिकाला त्याच्या मुलाने कॉल गर्लसोबत फ्लॅटमध्ये रंगेहाथ पकडल्यानंतर मुलाने आई, बहीण आणि भावाला घटनास्थ...
प्रयागराज (उत्तर प्रदेश): एका व्यावसायिकाला त्याच्या मुलाने कॉल गर्लसोबत फ्लॅटमध्ये रंगेहाथ पकडल्यानंतर मुलाने आई, बहीण आणि भावाला घटनास्थळी बोलावले. यावेळी वडील आणि मुलामध्ये वाद झाल्यानंतर मारामारी सुरू झाली.
व्यावसायिकाने पत्नी आणि मुलांना मारहाण केल्यानंतर एका मुलावर पिस्तूलने गोळी मारली. गोळी मुलाच्या पायाला लागली. यावेळी कॉल गर्लने घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी आरोपी वडील विवेक दुआला (वय 47) याला अटक केली. त्याची परवानाधारक पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली आहे. धुम्मनगंज पोलिस स्टेशन परिसरातील कालिंदीपुरम येथील मौसम विहार कॉलनीत शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
विनोद दुआची पत्नी पूजा यांनी धूमनगंज पोलिस स्टेशन गाठले आणि सांगितले, कालिंदीपुरममध्ये तिच्या कुटुंबासह राहते. पती विवेक दुआने घरापासून सुमारे 3 किमी अंतरावर वसंत विहार अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला आहे. कुटुंबात एका मुलीमुळे वाद सुरू आहे. ती एक कॉल गर्ल आहे. तिच्यामुळे, माझा नवरा मला आणि तिन्ही मुलांना विसरला. मुलांचे शिक्षण आणि घरखर्च थांबला. जेव्हा आम्ही कॉल गर्लसोबतचे नाते तोडण्याबद्दल बोललो तेव्हा त्यांच्यात वाद सुरू झाला. शनिवारी, माझा मोठा मुलगा देवांशने त्याच्या वडिलांना फ्लॅटमध्ये कॉल गर्लसोबत रंगेहाथ पकडले. दोघांमध्ये वाद सुरू झाला. मग मारामारी सुरू झाली. गोंधळ सुरू झाल्यावर मी, माझा धाकटा भाऊ आणि माझी मुलगीही तिथे पोहोचलो.
आम्ही कॉल गर्लला विरोध केला. तिला सोडून जाण्यास सांगितले. जेव्हा मी खोलीतून बाहेर जाण्यास सांगितले तेव्हा माझ्या पतीने माझी मुलगी, धाकटा मुलगा आणि मला खूप मारहाण केली. पतीला खोलीत ओढले आणि नंतर पिस्तूलने त्याने मुलावर गोळी झाडली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. आम्ही त्याला तातडीने रुग्णालयात नेले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पत्नी पूजाने धुमनगंज पोलिस ठाण्यात पती विवेक दुआविरुद्ध अर्ज दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पती विवेकला अटक केली.
COMMENTS