पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या दोन मित्रांनी एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मोशी येथे घडली आहे. या घटनेमुळे खळबळ...
पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या दोन मित्रांनी एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मोशी येथे घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दोघांच्या आत्महत्याचे कारण समजू शकलेले नाही.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
1) तुषार अशोक ढगे (वय 25), 2) सिकंदर सल्लाउद्दीन शेख (वय 30, दोघेही राहणार हुंडा पिंपळगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. मृत तुषार यांचा चुलता दत्तात्रय रावसाहेब ढगे (राहणार सणसवाडी तालुका शिरूर) यांनी याबाबत माहिती दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे दोघे एकमेकांचे मित्र असून काल मूळ गावावरून पुण्याला आल्याचे समजले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील भारतमाता चौकाजवळील खिरीड वस्ती, मोशी या ठिकाणी आज (शनिवार) एका लिंबाच्या झाडाच्या एकाच फांदीला गळफास घेतला आहे. दोघांच्या मृत्यूची चौकशी करीत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना आज सकाळी उघडकीस आली. हे दोघे ही चालक आहेत, मात्र त्यांनी एकत्रित आत्महत्या का केली असावी? याचं कारण अद्याप ही अस्पष्ट आहे. मोशीतील निर्जनस्थळी दोघांनी एकाच झाडाला एकाचवेळी गळफास घेतल्याने हळहळ व्यक्त केली जाती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेले दोन मित्र अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातले आहेत. मात्र, त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास करत आहोत.
COMMENTS