पुणे: पुणे शहरातील माजी नगरसेविकेच्या मुलाकडून एका युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून गर्भपात करायला लावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ए...
पुणे: पुणे शहरातील माजी नगरसेविकेच्या मुलाकडून एका युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून गर्भपात करायला लावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका युवकाच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
युवतीला (वय २८) प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करून गर्भवती राहिल्यानंतर तिला धमकावून तिची संमती नसताना जबरदस्तीने गर्भपात करायला लावले. तिने गर्भवती असताना तक्रार देऊ नये यासाठी युवतीला घेऊन जाऊन आळंदीत लग्न केलं, त्यानंतर संमती नसताना 2 वेळा गर्भपात देखील केला. त्यानंतर वारंवार मारहाण आणि धमकावत राहिला. 2021 पासून सुरू असलेला हा अत्याचार आत्तापर्यंत सुरू होता, अशी माहिती पीडित युवतीने तक्रारीमध्ये दिली आहे.
आरोपी युवक आणि पीडित युवतीची 2021 साली एका जीममध्ये ओळख झाली होती. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झाले. त्यानंतर आरोपीने युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यातून युवतीला तीन वेळा गर्भधारणा झाली होती. यामध्ये फिर्यादीची संमती नसताना 2 वेळा त्याने जबरदस्तीने गोळ्या देऊन गर्भपात केला. आता पुन्हा गरोदर असताना तिने तक्रार देऊ नये म्हणून घरच्यांना न सांगता फिर्यादीशी आळंदी येथे लग्न केले. परंतु नांदायला न नेता, तिचा गर्भपात करण्यासाठी तिला वारंवार मारहाण करत आहे, म्हणून पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीचे अन्य मुलींशी प्रेमसंबंध असल्याचा संशय युवतीला आला. याबाबत तिने विचारणा केली असता त्याने तिला शिवीगाळ करून धमकावले आणि मारहाण केली. मारहाण केल्यानंतर युवतीने त्याच्याशी बोलणे बंद केले, असे पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS