मुंबई : नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस सर्वसामान्यांसाठी दिलासा घेऊन आला आहे. राजधानी दिल्लीपासून ते मुंबई आणि चेन्नईपर्यंत देशातील सर्व महा...
मुंबई : नवीन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस सर्वसामान्यांसाठी दिलासा घेऊन आला आहे. राजधानी दिल्लीपासून ते मुंबई आणि चेन्नईपर्यंत देशातील सर्व महानगरांमध्ये गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एप्रिलच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमती सुधारित केल्या असून आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाला तर दुसरीकडे, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती अजूनही ‘जैसे थे’च आहेत.
19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आज म्हणजेच 1 एप्रिल पासून लागू असणार आहे. या नवीन कपातीनंतर, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत मुंबईत 1714.50 रुपये झाली आहे, जी पूर्वी 1755.50 रुपये इतकी होती. परिणामी या नव्या दर कपातीच्या निर्णयामुळे ढाबे, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल व्यावसायिकांना ही मोठा दिलासा मिळाला आहे. .
देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता 1762 रुपये झाली असून ती 41 रुपयांनी कमी झाली आहे.
तर कोलकातामध्ये 44 रुपये 50 पैशांनी कमी झाल्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरची नवीन किंमत 1868 रुपये झाली आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 42 रुपयांनी कपात करण्यात आली असून, ती आता 1713 रुपये 50 पैसे झाली आहे.
त्यामुळे चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर 43 रुपये 50 पैशांच्या कपातीनंतर सिलिंडरची नवीन किंमत 1921 रुपये 50 पैसे झाली आहे. जर आपण घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींबद्दल बोललो तर सध्या ते दिल्लीमध्ये 803 रुपये, मुंबईमध्ये 802 रुपये 50 पैसे, कोलकातामध्ये 829 रुपये आणि चेन्नईमध्ये 818 रुपये 50 पैसे उपलब्ध आहे. 9 मार्च 2024 रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सुमारे 100 रुपयांनी कमी करण्यात आली होती.
व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 41 रुपयांची कपात करण्यात आली असताना,मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती पुढे आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14. 2 किलोच्या दरात कुठलीही दरवाढ अथवा कापत केलेली नाही. 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 803 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये, मुंबईत 802. 50 रुपये तर चेन्नईमध्ये 818. 50 रुपये इतकी आहे. त्यामुळे सर्वसांमन्य जनतेला याचा कोणताही दिलासा अद्याप तरी होणार नाहीये. त्यामुळे आता चाकरमान्यांची काहीशी निराशा झाली असल्याचे बोलले जात आहे.
COMMENTS