पुणे: लोणी काळभोर परिसरातील एका जन्मदात्या आईनेच आपल्या दोन चिमुकल्या बाळांचा पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टेस...
पुणे: लोणी काळभोर परिसरातील एका जन्मदात्या आईनेच आपल्या दोन चिमुकल्या बाळांचा पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून लग्नाच्या 10 वर्षानंतर घरात जुळे बाळ जन्मली होती.
मात्र, बाळाची वाढ होत नसल्याने आणि उपचाराचा खर्च परवडत नसल्याने पाणीच्या टाकीत दोन लहान मुलांना मारले आहे.
चिमुकल्यांना पाण्यात बुडवून मारल्यानंतर आईनेही स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रतिभा मोहिते असे आईचे नाव आहे. लोणी काळभोर पोलिसांनी आईला अटक केली आहे. महिलेच्या भावानेच पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
लग्नाच्या 10 वर्षानंतर जन्मलेल्या मुलांची योग्य वाढ होत नव्हती. त्यामुळे त्यांचा उचारासाठी खूप खर्च येत होता, हा खर्च परवडत नसल्याने घरात तणाव वाढला या ताणावावरून आईने मुलांनाच संपवण्याचं आणि आपलेही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी दोन्ही बाळांना घेऊन आई घराच्या छतावर गेली त्यानंतर दोन्ही मुलांना छतावरील पाण्याच्या टाकीत बुडवले आणि त्यानंतर स्वतःही त्याच पाण्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार समोरच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्याने बघितला आणि महिलेच्या भावाला याची माहिती दिली. सगळे जमेपर्यंत दोन्ही बाळांनी जीव सोडला होता. त्यानंतर भावाने थेट पोलिसांत या प्रकरणाची तक्रार केली. याप्रकरणी महिलेवर खून केल्याचा गुन्हा दाखल करुन महिलेला अटक करण्यात आली आहे.
हृदयद्रावक घटना मंगळवारी (ता. 8) सकाळी पावणेसातच्या सुमारास महिलेच्या माहेरी थेऊरमधील दत्तनगर भागातील काकडे वस्तीत घडली आहे. याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी प्रतिभा हेमंतकुमार मोहिते (वय 35, रा. मीरजवाडी, आष्टा, जि. सांगली) या महिलेला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS