शिरुर तालुक्यात एक युवती आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळेस गप्पा मारत बसलेले असताना दोन व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवत लाथा बुक्क्यानी ...
शिरुर तालुक्यात एक युवती आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळेस गप्पा मारत बसलेले असताना दोन व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवत लाथा बुक्क्यानी मारहाण केली. तसेच आळीपाळीने त्या युवतीवर बलात्कार करुन तिच्या अंगावरील सोनं काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत घडला आहे.
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ दखल घेत १२ तासाच्या आत त्या दोन नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अमोल नारायण पोटे (वय २५) रा. संस्कृती डेव्हलपर्स पवार बिल्डींग, कारेगाव ता. शिरुर जि. पुणे मुळ (रा. ढोकराई फाटा, ता. श्रीगोदा जि.अहील्यानगर) आणि किशोर रामभाऊ काळे (वय २९) रा. संस्कृतीडेव्हलपर्स, लेन नं.१, कारेगाव ता. शिरुर जि.पुणे मुळ (रा. किल्ले धारुर, ता.धारुर जि.बीड) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एक १९ वर्षीय युवती आणि तिचा २० वर्षीय मामेभाऊ रात्री च्या सुमारास कारेगाव येथून घरी जात असताना घराच्या काही अंतरावर गप्पा मारत बसले होते. रात्री ११:०० च्या सुमारास एका दुचाकीवर दोन जण आले. त्यांनी पीडित युवती आणि तिच्या मामे भावाला त्यांच्याकडील चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. जबरदस्तीने एकमेकांना चुंबन व शरीर संबध करण्यास भाग पाडले आणि त्यांच्याकडील मोबाईल मध्ये फोटो व व्हिडीओ शुटींग काढून घेतले.
त्यानंतर पिडीतेच्या मामे भावाला त्यातील एकाने थोड्या अंतरावर घेवून गेला आणि त्यापैकी एकाने पीडितेवर बलात्कार केला. त्याच्यानंतर दुसऱ्याला बोलावून घेवुन पहिला युवक पिडीतेच्या मामे भावाकडे गेला. त्यानंतर दुसऱ्याने पीडिता आणि तिच्या मामे भावाला मारुन टाकीन नाहीतर आणखी लोकांना बोलावुन घेईन अशी धमकी देत पिडीतेवर बलात्कार केला आणि पिडीतेच्या गळयातील सोन्याचे दागिने चोरी करुन निघुन गेले.
पीडित युवतीने घरी जावून घडलेला सर्व प्रकार तिच्या बहीणीला सांगितला. त्यानंतर बहिणीच्या पतीने डायल ११२ वर कॉल करुन सदर प्रकाराची माहीती रांजणगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत पिडीतेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आणि आरोपी अमोल नारायण पोटे आणि किशोर रामभाऊ काळे या दोघांना ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील अधिक तपास रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सविता काळे या प्राथमिक तपास करत आहेत. रांजणगाव पोलिसांनी आरोपीना आज (दि २) रोजी शिरुर न्यायालयात हजर केले असता आरोपीना ७ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती आरोपीचे अॅड वकील किरण रासकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात महिलांची सुरक्षा वाऱ्यावर…
पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात (ता. २५ ) रोजी एका २६ वर्षीय युवतीवर बलात्कार झाला होता. तो आरोपी शिरुर तालुक्यातीलच होता. त्यानंतर काही दिवसातच शिरुर तालुक्यात दारु पिऊन आलेल्या दोन व्यक्तींनी एका १९ वर्षीय युवतीवर आळीपाळीने बलात्कार करत तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढुन घेतल्याने पुणे जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
COMMENTS