मुंबई : नव्या मंत्रिमंडळात विधानसभा अध्यक्षपद आणि विधानपरिषद सभापती पद हे भाजपकडे गेले. तर विधान परिषदेचे उपसभापती पद हे शिंदेंकडे राहिले. अ...
मुंबई : नव्या मंत्रिमंडळात विधानसभा अध्यक्षपद आणि विधानपरिषद सभापती पद हे भाजपकडे गेले. तर विधान परिषदेचे उपसभापती पद हे शिंदेंकडे राहिले. अशातच आज विधानसभा उपाध्यक्षपद हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्यात आले.
यासाठी आज पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा निवडून आलेल्या आण्णा बनसोडे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आण्णा बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज सादर केला होता. परंतु विरोधकांकडून कोणताही उमेदवारी अर्ज सादर न केल्याने आज त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आज सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी प्रस्ताव मांडला. त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अनुमोदन दिले.
यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आण्णा बनसोडे यांची एकमताने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी आण्णा बनसोडे यांना उपाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या निवडीसाठी अभिनंदन प्रस्ताव सादर केला आहे.
COMMENTS