राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.विद्या...
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.विद्यार्थी हाच शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असल्याने पायाभूत स्तरापासून माध्यमिक स्तरापर्यंत सर्व शिक्षकांचे सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने सर्व स्तरांवर शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.प्रत्येक मूल शिकले पाहिजे,त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे व त्यासाठी प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकांना क्षमता वृद्धी प्रशिक्षण देण्यात आले.शिक्षक अध्यापनामध्ये नवीन ज्ञानाचा, कौशल्यांचा व क्षमतांचा उपयोग करतील व त्यातूनच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल असे प्रतिपादन पुणे डायटच्या अधिव्याख्याता राजश्री तिटकारे यांनी केले.
नारायणगाव येथील ग्रामोन्नत्ती मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे आणि पंचायत समिती जुन्नर यांच्या वतीने आयोजित शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 च्या चार टप्प्यांमध्ये दिनांक 10 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 7 मार्च 2025 या कालावधीमध्ये गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे व विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे तसेच नवनियुक्त गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले यांचे वेळोवेळी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन लाभले.शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणात सुलभक म्हणून गटप्रमुख विजय पवार,रमेश शेटे,उत्तम महाले,निलेश ढवळे,श्रीकृष्ण मुंडे,विजय चौधरी,कीर्ती थोरात,दिपाली थोरात,प्रशांत शेटे,सुनीता डोंगरे यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले.प्रशिक्षण कालावधीमध्ये ग्रामोन्नती मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय नारायणगावचे प्राचार्य डॉ.बी.एस.मुरादे,सबनीस विद्यामंदिराचे मुख्याध्यापक सतिश तंवर,उपप्राचार्य हनुमंत काळे,मुख्याध्यापिका अनघा जोशी,मुख्याध्यापिका सुनिता पारखे यांनी सहकार्य केले.
प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी गटचर्चा आणि गटकार्यामध्ये सहभाग घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे स्वागत केले.मंगेश मेहेर,रमाकांत कवडे,रविंद्र वाजगे,तबाजी वागदरे,मेघनाथ बोऱ्हाडे,किर्ती खोब्रागडे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक गटप्रमुख विजय पवार यांनी केले.सूत्रसंचालन रमेश शेटे,विजय नागरे यांनी केले तर आभार साईनाथ कनिंगध्वज यांनी मानले.
COMMENTS