प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर पेठ दि.४मार्च आंबेगाव तालुक्यातील गुणवत्तेसाठी नावाजलेले श्री वाकेश्वर विद्यालयात आखिल विश्वातील हिंदुं बा...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
पेठ दि.४मार्च आंबेगाव तालुक्यातील गुणवत्तेसाठी नावाजलेले श्री वाकेश्वर विद्यालयात आखिल विश्वातील हिंदुं बांधव मायभगीनींचे आराध्यदैवत परमपराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज यांचा छावा महापराक्रमी धर्मवीर शंभूराजे यांची क्रुर मोघल औरंगजेबानं कपटानं पकडुन अतीशय राक्षसी, पाशवी पद्धतीने हाल हाल करून निर्घृण हत्या केली,मराठी रयत आणि आजही मराठी माणुस त्या आठवणीनेही अपार दुखात जातो तोच शंभुराजांना बलिदान मास २८ फेब्रुवारी ते २९ मार्च चाळीस दिवस दुखवटा पाळुन लाडक्या शंभुराजांना आदरांजली वहातो.
याच बलिदानाची ,मराठी पराक्रमी विराची बलिदान मासानिमित्त अभिवादन व स्मरणार्थ पेठ च्या श्री वाकेश्वर विद्यालयात राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ,पुणे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रा.अनिल निघोट व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा.सुरेखाताई निघोट, यांनी निबंध, वक्तृत्व, चित्रकला,समुहगीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात शंभरावर विदयार्थ्यांनी सहभागी होते, ज्यात क्षितीजा काळे,साईराज पवळे, मराठी श्रेया भागडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. भाषा ईतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, मराठी साहित्यिक,समाजसुधारक यांच्याबद्दल सादरीकरण करून ऊपस्थितांची मने जिंकली.
यावेळी पेठचे सरपंच संजय पवळे,भावडीचे रपंच कमल पंडित कातळे, उपसरपंच सोपानराव काळे, संस्था अध्यक्ष बाळासाहेब पवळे,खजिनदार ऊमेश तळेकरमराठा महासंघ तालुका सरचिटणीस गुलाब कुरकुटे ,संचालक कंधारे, निलेश पवळे,शाहीर धर्माजी पवळे,राम ऊढाणे, मुख्याध्यापक बी.डी.धुमाळ सर,पर्यवेक्षक बी के धुमाळ संजय पवळे व शिक्षकव्रुंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.
सुत्रसंचालन बी के धुमाळ सर तर आभार लिला गुंजाळ यांनी तर परीचय आरती धुमाळ भागडे यांनी मानले.
COMMENTS