प्रतिनिधी: प्रा. प्रविण ताजणे सर केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने घेतलेल्या "इन्स्पायर अवॉर्ड" मध्ये समर्थ ...
प्रतिनिधी: प्रा. प्रविण ताजणे सर
केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने घेतलेल्या "इन्स्पायर अवॉर्ड" मध्ये समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल,बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील अथर्व भोसले व प्रिया राजदेव या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची निवड झाल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.
विद्यार्थी विज्ञान विषयाकडे आकर्षिला जावा,त्यांच्यातील सर्जनशील विचारांना चालना मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने 'इन्स्पायर अवार्ड' हा सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
समर्थ गुरुकुल मध्ये इयत्ता नववी मध्ये शिकत असलेल्या प्रिया राजदेव हिने "ब्लूटूथ कंट्रोल ग्रास कटिंग अँड पेस्टिसाइड रोबोट" हा प्रकल्प तयार केलेला आहे.नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमधील वेगवेगळे प्रयोग रोबोटच्या सहाय्याने करणे,त्याचप्रमाणे शेती मधली छोटी छोटी कामे जसं की गवत कापणे असेल किंवा शेतपिकावर केली जाणारी औषध फवारणी असेल या सर्व गोष्टी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केल्या जाऊ शकतात.
तसेच अथर्व भोसले या विद्यार्थ्याने "ऑटोमॅटिक फॅन स्पीड कंट्रोल बेस्ट ऑन रूम टेंपरेचर" हा प्रकल्प तयार केलेला आहे.
घरामध्ये देखील आपण तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या घरातील पंख्याच्या वेग कमी किंवा अधिक आपल्याला हव्या त्या तापमानाप्रमाणे करता येऊ शकतो की ज्यामुळे आपल्या घरातील वीज बहुतांशी प्रमाणामध्ये वाचू शकते.
समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पनेचा वापर करून तयार केलेल्या या दोन्ही प्रकल्पांची "इन्स्पायर अवॉर्ड" मध्ये निवड करण्यात आलेली आहे.
विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्याचप्रमाणे प्रयोगशील वातावरण निर्मिती करून समाजातील गरजांची पूर्तता करणारे नवनवीन तंत्रज्ञानातील प्रयोग विद्यार्थ्यांनी करावेत यासाठी संस्था नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असते.विद्यार्थ्यांमध्ये असलेली प्रयोगशीलता तसेच नाविन्यपूर्ण संकल्पना देशाचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाचे असल्याचं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके म्हणाल्या.
या विद्यार्थ्यांना प्रिया कडूसकर,कविता ठुबे व विशाखा शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,रिसर्च इनोवेशन व इंटरनॅशनलायझेशन सेलचे डॉ.प्रतिक मुणगेकर,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,पर्यवेक्षक सखाराम मातेले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS