प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर आंबेगाव तालुक्यात भक्तीभाव व पारमार्थिक क्षेत्रात नावाजलेल्या नारोडी गावातील हुले स्थळ नंबर दोन येथे ...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
आंबेगाव तालुक्यात भक्तीभाव व पारमार्थिक क्षेत्रात नावाजलेल्या नारोडी गावातील हुले स्थळ नंबर दोन येथे तीथीप्रमाणे शिवजयंती मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली.
ऐतिहासिक शिवकालीन प्रात्यक्षिके,विविध खेळ, अहिल्यानगर येथील प्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ. नागेश गवळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि छावा धर्मवीर शंभूराजे यांच्या जीवनातील विविध प्रसंगांच्या सादरीकरणातुन,आपल्या अमोघ वाणीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तर रणरागीणी पथक सोळु यांनी ऐतिहासिक शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक केले, अनेक बालव्याख्यात्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर भाषणे केली.
शिवज्योत शिवरायांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी वरुन आणण्यात आली, तर महिलांसाठी हळदी कुंकू चा कार्यक्रम ही ठेवण्यात आला होता व आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
कार्यक्रमास नारोडी व हुले स्थळ नंबर दोन येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS