नांदेड : विद्यार्थिनीने अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. य...
नांदेड : विद्यार्थिनीने अश्लील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
नांदेडमधल्या खासगी शाळेतील मुख्याध्यापकावर त्याच शाळेच्या विद्यार्थिनीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा आरोप झाला. यानंतर पीडित मुलीने याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिली आणि कुटुंबातील नातेवाइकांनी पोलिस स्टेशन गाठत मुख्याध्यापकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला.
दरम्यान, मुख्याध्यापकाला आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच विष पित आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मुख्याध्यापकाने एक चिठ्ठीही लिहिली होती. पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
COMMENTS