जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ आयोजित "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार २०२५" पुरस्कार वितरण सोहळा नारायणगाव त...
जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ आयोजित "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार २०२५" पुरस्कार वितरण सोहळा नारायणगाव ता.जुन्नर येथील कलासागर गार्डन मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी आपल्या मनोगतात जुन्नर तालुक्याचा शैक्षणिक विकास निश्चितपणे चांगला आहे.तालुक्यातील शिक्षकांचे काम कौतुकास्पद आहे अशी शाबासकीची थाप दिली.नाणेघाटात मराठीचा पहिला लेख सापडला त्याचा अभिमान शिवजन्मभूमीला आहे आणि तो अभिमान टिकविण्याचे काम जुन्नर तालुक्यातील शिक्षक निश्चितपणे करतील असा विश्वास व्यक्त केला.
मान्यवरांच्या शुभहस्ते १३ शाळा व ७३ गुरुजनांना फेटा बांधून,शाल,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद पुणेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने जि.प.माजी उपाध्यक्ष शरदराव लेंडे,विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर,तालुका शिवसेना प्रमुख माऊली खंडागळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार,शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर,जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे,तालुका संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे,कार्याध्यक्ष वैभव सदाकाळ,पुरस्कारार्थी रेश्मा पानसरे,राजेंद्र फापाळे यांनी मनोगत व्यक्त करून शिक्षक संघाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
अध्यक्षीय मनोगतात देवराम लांडे यांनी ग्रामीण भागातील शाळा शिक्षकांमुळे टिकल्या असून शिक्षकांचे काम दुर्गम भागात अतिशय दर्जेदार आहे.शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत निश्चितपणे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. सत्यशोधक महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा रवींद्र पानसरे व रेश्मा पानसरे या दाम्पत्यानी केली होती.
कार्यक्रम प्रसंगी शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष विनायक ढोले,साहेबराव मांडवे,जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सुशीला डुंबरे,विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे,अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कानडे,मनिषा कानडे, संघाचे तालुका अध्यक्ष रमाकांत कवडे,माजी अध्यक्ष रविंद्र वाजगे,उपेंद्र डुंबरे,विकास मटाले,नेते विश्वनाथ नलावडे,सभापती अनिल कुटे,उपसभापती सुनिता वामन,अंबादास वामन, सविता कुऱ्हाडे,तालुका शिक्षक पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ,कोषाध्यक्ष अशोक बांगर, संदिप शिंदे,दिपक मुंढे,राजेंद्र चिलप,पंडित चौगुले,महिला आघाडी अध्यक्षा शुभदा गाढवे,कोषाध्यक्ष मनिषा डोंगरे,सरचिटणीस वैशाली कुऱ्हाडे,विभागप्रमुख अलका घोलप,सुनिता औटी,हेमलता राजगुरू,विजय नवले,शांताराम डोंगरे,मारूती निर्मळ,बाळू कडू, सुरेश गडगे,शरयू टोयोटा मंचर व्यवस्थापक आनंद आंधळे,पटवर्धन सर,बाळासाहेब, गिलबिले,सुनिल हाडवळे आदि मान्यवर उपस्थित होते.
ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान नारायणगावच्या सभासदांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.रांगोळी रेखाटन महिला संघ शिलेदार नारायणगाव यांनी केले.जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे संघ शिलेदार, आजी माजी सर्व पदाधिकारी,ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष रमाकांत कवडे यांनी केले. सूत्रसंचालन सरचिटणीस प्रभाकर दिघे व कार्याध्यक्ष उज्वला लोहकरे यांनी केले तर आभार दत्तात्रय हांडे यांनी मानले.
COMMENTS