प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे या तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये ...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे या तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये "कॅम्पस ड्राईव्ह २०२५" अंतर्गत बजाज ऑटो लिमिटेड चाकण (पुणे) या कंपनी मार्फत मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
या कॅम्पस ड्राईव्ह साठी ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना विषयाबाबतचे असलेले सखोल ज्ञान,संभाषण कौशल्य,सॉफ्ट स्किल,कलचाचणी या बाबीचा विचार करून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती कंपनीच्या एच आर सुदर्शना वाकचौरे यांनी दिली.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातून गौरव शिंगोटे,प्रशांत बाचकर,तुषार डोमे,ओमकार खोमणे,सुरज औटी,सुरज चौधरी,ओमकार फापाळे,एमडी खुश दिल राजा या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभागातून ऋतुजा धुंडव,माऊली वाजे,वैभवी गोडसे,अर्पिता हिंगडे,तनुजा इंदोरे,महेक पटेल,नंदिनी लोणकर,निखिल बढेकर,वैभव मेसे,स्वरूप थिटे,सरगम मुळे,चारू मुळे,सिद्धी शिंदे यांची निवड करण्यात आली.
मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभागातून वैष्णव विश्वासराव व सुदर्शन विश्वासराव या विद्यार्थ्यांची वार्षिक निवड करण्यात आली.
सदर प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा संकेत विघे,प्रा.हुसेन मोमीन,प्रा.माधवी भोर,प्रा.प्रणाली थोरात प्रणाली,प्रा.प्रकाश डावखर यांनी परिश्रम घेतले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्राचार्य अनिल कपिले,उपप्राचार्य संजय कंधारे,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले तसेच सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
COMMENTS