प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट हिवरे तर्फे नारायणगाव देवजायेथील विदयार्थ्यांनी ऐतिहासिक, मराठी भाषा महाराष्ट्र व देशाची संस्कृती, लोककला,सं...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट
हिवरे तर्फे नारायणगाव देवजायेथील विदयार्थ्यांनी ऐतिहासिक, मराठी भाषा महाराष्ट्र व देशाची संस्कृती, लोककला,संतांची महती दाखवणारी विविध गीतांवरील नृत्य प्रसंग सादरीकरण करून ऊपस्थितांची मने जिंकली!
संस्थेचे तुषार देवकर यांनी प्रस्तावना करून संस्थेची माहिती दिली तर राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हाप्रमुख प्रा.अनिल निघोट यांनी संस्था व सर्व शिक्षक आणि विदयार्थ्यांचे चांगल्या तयारीसह सादरीकरण केल्याबद्दल खास कौतुक तर मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा सुरेखाताई निघोट यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे तुषार देवकर तसेच बाळासाहेब मुळे,रामदास नेहरकर,विनायक मुळेअनिल पाटील ज्ञानमंदिर शाळेचे गुणी विद्यार्थ्यांपैकी झाशीची राणी -काव्यांजली राजेश भोर, छत्रपति शिवाजी महाराज - साई गणेश अडसरे, गोरा कुंभार - वरद चेतन सातपुते,श्रीकृष्ण - दर्शिल शिवदास खोकराळे, गणपती - स्वानंद स्वप्नील वागघमारे,विठ्ठल - श्लोक अमित अडसरे. यांनी आपल्या नृत्याभिनयास प्रेक्षका़ंनी उदंड प्रतिसाद दिला. यावेळी स्थानिक सेवा समितीचे श्री तुषार ज्ञानेश्वर देवकर. मुख्याध्यापक - गणेश ज्ञानेश्वर थोरात. मान्यवर, पालक, स्थानिक ग्रामस्थ व मुला़ची तयारी करुन घेणारे शिक्षक वृंद ऊमेश गवळी सर, आदेश तांबोळी सर,प्रशांत वाघ सर, महाले मॅडम, वृषाली सातपुते मॅडम,शिंगाडे , सविता रुखबंद,अस्मिता नेहे, वैशाली महाडिक, माया लांडगे, भोर योगेश वैदय,सुनिल गायकवाड , सुप्रिया शेटे भुजबळ यांनी विदयार्थ्यांची संपुर्ण तयारी करून घेत आपले कौशल्य दाखवुन दिले. अनुजा देवकर यानी बहारदार सुत्रसंचालन केले.
COMMENTS