विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर पुणे. महाराष्ट्रात मराठी विषय इयत्ता बारावी पर्यंत सक्तीचा करण्याचा शासन परिपत्रक आदेश १३ सप्टेंबर २०२...
विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
पुणे. महाराष्ट्रात मराठी विषय इयत्ता बारावी पर्यंत सक्तीचा करण्याचा शासन परिपत्रक आदेश १३ सप्टेंबर २०२४ रोजी पारित झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून करावी यासाठी पुणे जिल्हा मराठी विषय शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा अरविंद मोडक आणि कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी यांना नुकतेच निवेदन दिले आहे.
गत ऑक्टोबर महिन्यात केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला आहे. १३ सप्टेंबर २०२४ रोजी राज्य शासनाने मराठी विषय इयत्ता बारावी पर्यंत सक्तीचा केलेला आहे;परंतु मराठी भाषा ही सर्व विद्या शाखेत अनिवार्य करून शासन आदेशाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करावी, यासाठी राज्य महासंघाचे अध्यक्ष प्रा सुनील डिसले,कार्याध्यक्ष डॉ मनीषा रिठे,सचिव प्रा बाळासाहेब माने,कार्याध्यक्ष संपत गर्जे,कोषाध्यक्ष प्रा संजय लेनगुरे,सहसचिव प्रा बापू खाडे,समन्वय डॉ पांडुरंग कंद,सल्लागार प्रा प्रकाश अकुंश यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा अरविंद मोडक यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांना लेखी निवेदनाद्वारे विनंती केली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना पुणे जिल्हा कार्यकारणीचे कार्याध्यक्ष प्रा.निलेश आमले, सचिव प्रा.विजय मराठे,उपाध्यक्ष प्रा.धनराज पाटील,उपाध्यक्ष प्रा नरेंद्र रासकर,कोषाध्यक्ष प्रा.डॉ अभिषेक लोखंडे,सहसचिव प्रा.चंद्रकांत भोजने,समन्वयक प्रा सुनिलराजे निंबाळकर,तज्ज्ञ सल्लागार प्रा.जगदिश पाटील, मार्गदर्शक प्रा विजय लोंढे,प्रा अदिनाथ दहिफळे,जुन्नर तालुका अध्यक्षा प्रा.सारिका सोनार,हवेली तालुका प्रमुख प्रा सुभाष खिलारे,भोर वेल्हा तालुका प्रमुख प्रा स्वाती दुधगावकर,मावळ तालुका अध्यक्ष प्रा सचिन लांडगे,शिरूर तालुका प्रमुख प्रा महावीर भिसे,पुणे शहर अध्यक्ष प्रा अशोक बोबडे,सदस्य प्रा सुनिल गुरव,प्रा जुबेर पटेल,प्रा संतोष झांजे,प्रा पृथ्वीराज जाधव आदी जिल्ह्याचे मराठी विषय शिक्षक उपस्थित होते.
COMMENTS