जुन्नर – जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिध्दनाथ ( हनुमानवाडी ) ता. जुन्नर जि. पुणे ४१०५०२ येथे राहणारे शेतकरी संदेश मारूती खंडागळे यांची मजूरी...
जुन्नर – जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिध्दनाथ ( हनुमानवाडी ) ता. जुन्नर जि. पुणे ४१०५०२ येथे राहणारे शेतकरी संदेश मारूती खंडागळे यांची मजूरीने माणसे कामाला देतो असे सांगून रविन सेनानी ( मोबाईल क्रमांक - ९१११९७२८७३ )राहणार डोंगरगाव जिल्हा बडवानी मध्यप्रदेश या व्यक्तीने जवळपास १०,४०० रूपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
संदेश खंडागळे म्हणाले की, सध्या जुन्नर
तालुक्यात कांदे काढणी सुरू आहे त्याकरीता कांदे काढणीला मजूर मिळत नाहीत म्हणून
रविन सेनानी या व्यक्तीने मला स्वतहून मजूर आणून देतो असे आश्वासन देऊन त्याने मजूरीचे
पैसे माझ्या फोन पे वरून मारून घेतले मात्र त्यानंतर सदर व्यक्तीला खंडागळे यांनी दि.
१४ /३/२०२५ या दिवशी २०० रूपये गुगल पे ने व २०० फोन पे, १६/३/२०२५ रोजी दुपारी ४.११ मि. गाडीत डिझेल
भरण्यासाठी ४००० रूपये फोन पे, सायंकाळी
६.२७ नाश्त्यासाठी २००० रूपये फोन पे ने, त्यानंतर १७/३/२०२५ वेळ रात्री १.३८ मि.
४००० रूपये फोन पे ने करवून घेतले मात्र
त्यानंतर त्याला त्याला दि. १७/३/२०२५ रोजी सकाळी वारंवार फोन केला असता त्याने
माझे फोन कॉल उचलले नाहीत, तरी सदर व्यक्तीला त्यांनी सकाळी ११ वाजेपर्यंत फोन
केला असता सेनानी याने फोन उचलत नसल्याने खंडागळे यांना संशय आला, तेव्हा
त्यांच्या लक्षात आले की, त्यांची सदर व्यक्तीने
आर्थिक फसवणूक केली आहे, व त्यांनी या व्यक्तीबद्दल अधिक माहिती काढली असता
त्यांच्या असे लक्षात आले की, सदर रविन सेनानी नावाच्या व्यक्तीने अनेक लोकांची
अशीच कांदे काढणीसाठी मजूर देतो म्हणून आर्थिक फसवणूक केलेली आहे. त्यानंतर त्यांनी
१९३० या क्रमांकावर कॉल करून सायबर क्राईमला श्री. रविन सेनानी यांच्याविरोधात
त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर सदर व्यक्तीचे बॅंक खाते
गोठवण्यात आले. त्यानंतर सदर व्यक्ती खंडागळे यांच्याशी व त्यांचे भाऊ स्वप्निल
मारूती खंडागळे यांच्याशी व्हाट्सअपद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागले
त्यावेळी सदर व्यक्तीने त्यांना सांगितले की, माझे बॅंक खाते तुम्ही चालू करा मग मी तुमचे
पैसे परत करतो तसे न केल्यास मी दुसऱ्या खात्यावरून तुमच्या खात्यावर म्हणजेच श्री
संदेश मारूती खंडागळे यांच्या खात्यावर पैसे पाठवून तुमची ही बॅंक खाती अशाच
प्रकारे बंद करेल अशी धमकी देऊ लागली तरी, सदर व्यक्तीचा शोध घेण्यात यावा व सदर
व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे पत्र जुन्नर पोलीस स्टेशनला
खंडागळे यांनी दिले आहे. व अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून सर्व शेतकऱ्यांनी
सावध राहा असे खंडागळे म्हणाले.
COMMENTS