विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे दिनांक 7 मार्च 2025 रोजी मराठी विभाग मराठी वाङ्मय मंडळ IQEC ...
विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे दिनांक 7 मार्च 2025 रोजी मराठी विभाग मराठी वाङ्मय मंडळ IQEC विभागअंतर्गत 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर डोळे मेडीकल फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालक डॉ. स्मिता डोळे (लेखिका, कवयित्री )उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी. वाघमारे होते.
डॉ .स्मिता डोळे यांनी मराठी भाषेला मिळालेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा यावर आपली मते मांडली. अभिजात मराठी भाषेचे निकष आणि अभिजात दर्जा मिळाल्यामुळे होणारे फायदेही त्यांनी अत्यंत छान शब्दात विद्यार्थ्यांना पटवून दिले. लिळाचरित्रापासून सुरू झालेली मराठी साहित्य निर्मिती पुढे पुढे वृद्धींगत होत गेली आणि त्यातून सर्व साहित्यकारांचा मोलाचा वाटा आहे याची माहिती त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितली.
आपल्या विद्यार्थ्यांमधूनही अनेक लेखक कवी निर्माण झाले पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे असे प्रतिपादनही त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. एम बी वाघमारे यांनी मराठी भाषेचा ठेवा जतन करण्यासाठी घराघरातून मराठी बोलली गेली पाहिजे. दुसऱ्या भाषेतून आलेल्या शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधून ते वापरले गेले पाहिजेत तरच आपली मराठी भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन होऊ शकते. व आज मिळालेला अभिजात दर्जा टिकवला जाऊ शकतो असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यावर आधारित भित्तीपत्रके तयार केली त्याचबरोबर मनोगते आणि कविताही सादर केल्या. या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही. बी कुलकर्णी , उपप्राचार्य डॉआर.डी चौधरी ,कला शाखा प्रमुख डॉ.ए.एस पाटील वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. एस. जी. जाधव, हिंदी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ.बी .एम. माने आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. व्ही व्ही नढे यांनी केले, सूत्रसंचालन कु.कार्तिकी काशीद तर आभार प्रा. विष्णू घोडे यांनी मानले.
COMMENTS