प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर आज दि.०८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डिसेंट फाउंडेशन पुणे ,हायस्पीड स्किल हब जुन्...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
आज दि.०८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डिसेंट फाउंडेशन पुणे ,हायस्पीड स्किल हब जुन्नर व श्री राध्येशम दिव्यांग सशक्तिकारण केंद्र जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर येथे मोफत शिवणकला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी कुळमेथे ,जयहिंद शैक्षणिक संकुल कुरण च्या संचालिका डॉ.शुभांगी गुंजाळ व डॉ.शुभांगी वलवणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
हे प्रशिक्षण चाळीस दिवस चालणार असून यासाठी सत्तर महिलांनी नावानोंदणी केलेली आहे. तसेच यापूर्वी देखील सत्तर महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून , समजतील गोर गरिब व गरजू महिलांना प्रशिक्षित करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जात असल्याची माहिती डिसेंट फाउंडेशचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी यावेळी बोलताना दिली.
यावेळी डिसेंट फाउंडेशचे सचिव डॉ.एफ.बी.आतार यांच्याकडून सौ. ताहिरा साजिद आतार जुन्नर व
सौ. गीता सुभाष केवळ जुन्नर या दोन गरजू प्रशिक्षित महिलांना शिलाई मशिन देण्यात आल्या.
याप्रसंगी डिसेंट फाउंडेशचे संचालक आदिनाथ चव्हाण ,हायस्पीड स्किल हब चे संस्थापक दिलीप भगत, श्री राध्येशम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राचे अध्यक्ष दीपक चव्हाण, अरुण शेरकर ,राज फाउंडेशचे अध्यक्ष श्रीकांत जाधव, प्रा.शुभांगी सैद, ऍड सलमा सय्यद, प्रशिक्षक छाया सिरसोदे आदी मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
COMMENTS