मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या झाली. हत्येच्या मागील आरोपींना अटक व्हावी आणि देशमुख यांच्या कुटुंबि...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या झाली. हत्येच्या मागील आरोपींना अटक व्हावी आणि देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून राज्यभर आंदोलने झाली.
त्यात महिला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आघाडीवर होत्या. काल ( २६ मार्च ) झालेल्या सुनावणींनंतर या हत्येमागचा मास्टरमाइंड सुदर्शन घुले याने आपल्यावरील आरोप मान्य करून हत्येचे कारण स्पष्ट केले. सुदर्शनने दिलेल्या कबुलीनंतर आता अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"त्याने पोलिसांसमोर कबुली दिली असेल तर ती तितकी ग्राह्य धरली जाणार नाही. मॅजिस्ट्रेटपुढे कबुली दिली असेल तर केस संपण्यात जमा आहे. त्याने नक्की कोणासमोर कबुली दिलीय ते अजून स्पष्ट झालेले नाही. कलाम १६४, की कलाम २५ खाली कबुली दिलीय ते माहिती नाही. कलाम १६४ खाली कबुली दिली असेल तर चांगलं आहे",असं दमानिया म्हणाल्या. तसेच कराडच्या मार्गदर्शनाखाली हत्या झाली तर मग घुले म्होरक्या कसा/ हा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
एक एक प्रकरण बाहेर येत असतं हळूहळू एकेक जण आता बॅकफूट वर जाताना दिसत आहेत. सुरेश धस बॅकफूटवर आहेत का? याबद्दल विचारले असता दमानिया म्हणाल्या, "प्रश्नच नाही संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे यांना तुम्ही आता बोलाताना ऐकणार नाही. हे सगळे जण आपपाल्या ठिकाणी हेच करताना दिसतायत. एक-एक प्रकरण बाहेर येत असताना, सगळे बॅकफुटवर जाणार यात शंका नाही. आता त्यांना जाणवतंय की,आपण काही बोललो तर आपल्यावर शेकेल, आपल्याही गोष्टी बाहेर येतील." अंजली यांच्या पुढच्या भूमिकेबद्दल "ऑफिस ऑफ प्रॉफिट किंवा कृषी घोटाळा यावर एकतरी आमदार अधिवेशनात बोलेल, असं मला वाटत होतं. पण कोणीच चौकशीची मागणी केली नाही. आता हाय कोर्टासमोर मी माझ म्हणणं मांडणार. आधी ठरवलेलं, थोडी वाट बघायची, अधिवेशन संपल्यानंतर मी पुढच पाऊल उचलणार होते, तसं आता करणार आहे." असं त्या म्हणाल्या.
COMMENTS