पुणे प्रतिनिधी : सुनील शेवरे पुणे - मिनी महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यकं आयुक्त हे मुख्य अधिकारी म्हणून कर्त...
पुणे प्रतिनिधी : सुनील शेवरे
पुणे - मिनी महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यकं आयुक्त हे मुख्य अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असतात. यात हद्दीतील सर्व प्रकारच्या प्रशासकीय सेवा यांच्या माध्यमातून पुरवली जाते. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे गेल्या काही वर्षात केवळ एकच अधिकारी सहाय्यक आयुक्त म्हणून टिकले, ते म्हणजे अविनाश सपकाळ. मधल्या काळात त्यांची पदोन्नती होऊन सद्या ते झोन दोन चे उपायुक्त आहेत. त्यांच्यानंत्तर आताही सर्व अधिकाऱ्यांनी प्रभारी म्हणून पदभार सांभाळला आहे. सद्या प्रभारी म्हणून पदभार घेतलेले प्रदीप आवाड यांना या कार्यालयात येऊन एक वर्ष झाले.
नोव्हे 2023 मध्ये ते बिबवेवाडी कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून रुजू झाले, एका वर्षात त्यांनी इतर प्रभारी अधिकाऱ्याच्या तुलनेत उत्तम कामगिरी बजावली असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे. जन्म मृत्यू दाखले पासून ते अतिक्रमण विभाग, आरोग्य विभाग, उद्यान विभाग, आकाशचिन्ह विभाग अंतर्गत, समाज कल्याण विभाग, वारस प्रकरणे या संबंधी त्यांनी काही कठोर पाऊले उचलून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत म्हणून ते प्रशासकीय कामाच्या कौतुकास पात्र आहेत. कामाचे विभाजन करून त्यांनी तक्रारीचे निवांरण केले आहे. कामाच्या बाबतीत योग्य नियोजन करून त्यांनी आपल्या सहकार्या कडून उत्तम प्रकारे काम करून घेतले. एकूण पेंडन्सी रिपोर्ट मध्ये बिबवेवाडी चा हा अनुक्रमे पंधरावा म्हणजे शेवटचा क्रमांक लागतो. यात मोलाचा वाटा हा इथे काम करणारे अधिकाऱ्यांचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हजेरी साठी शिस्त लावली. प्रशासन पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्याना पदोन्नती मिळायला हवीच. ती मिळेलही परंतु अशा अधिकाऱ्यांचे अनुकरण करणेही गरजेचे आहे. शंभर कलमी कार्यक्रमाच्या अंतर्गत हिरकणी कक्ष उभारले असून त्याचे उदघाटन काही दिवसात होईल.
पार्किंग ची व्यवस्था उत्तम
वॉर्ड ऑफिस अधिकाऱ्याना पार्किंग साठी जागा ही झोपडपट्टी पुनर्वसन निर्मूलन ऑफिस येथे केली असून जे जन्म मृत्यू दाखला कार्यालय जवळ वाहने लावतील त्यांच्यावर थेट कारवाई चे आदेश दिले आहेत. आवाड हे त्यांच्या कामगिरीमुळे पदोन्नतीच्या वाटेवर असून काही दिवसात ते महापालिकेच्या मुख्य खात्यातील महत्वाचा पदभार घेण्याची शक्यता आहे.
सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर
प्रदीप आवाड हे सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असतात, पंधरा दिवसातून एक वेळा सर्वांची बैठकं घेऊन कामाचा आढावा घेतला जातो. सामान्य नागरिकांच्या समस्या या स्वतः सोडवण्यावर भर.
गलीच्छ वस्ती निर्मूलन कार्यालयात देखील आणली सुसूत्रता. बिबवेवाडी अंतर्गत एकूण चार झोपडपट्टी असून यातील अनेकांचे जुन्या सिस्टीम मधील नावे गायब होती त्यावर काम करून आज जवळपास ऐंशी टक्क्याहून अधिक नागरिकांची नावे संगणक प्रणाली वे आणली गेली आहेत.
बिबवेवाडी अंतर्गत या आहेत झोपडपट्ट्या
भीमदीप झोपडपट्टी, चैत्रबन वसाहत, प्रेमनगर वसाहत, डॉ बाबासाहेब आंबेडकरनगर वसाहत, डायस प्लॉट झोपडपट्टी, मीनाताई ठाकरे वसाहत, संदेशनगर भीमाले कॉम्प्लेक्स ( झोपडपट्टी पुनर्वसन योजना )
COMMENTS