प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर मंचर : दि ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शिवसेना महिला आघाडी नेत्या व राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
मंचर : दि ८ मार्च
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शिवसेना महिला आघाडी नेत्या व राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्राध्यापक सुरेखाताई अनिल निघोट यांनी अनेक कर्तुत्ववान महिलांचा प्रत्येक वर्षी प्रमाणे सन्मान करुन शुभेच्छा दिल्या.
मंचर उपजिल्हा रूग्णालयातील वैदयकीय अधिकारी , परिचारिका , महिला कर्मचारी ,आशावर्कर यांचा सन्मान केला ज्यात डॉ.आश्विनी घोडे, डॉ.प्रियंका, नम्रता वळवी,त्रुप्ती जाधव,मंजु आढारी,अंजली ईंदोरे, निकीता निघोट,सायली डोके,मनिषा विटे,सुरेखा घोटे ऊपस्थित होत्या.
मंचर पोलीस स्टेशन येथे सहायक पोलीस निरीक्षक कराळे मॅडम व महिला पोलीस कर्मचारी तसेच आदिवासी वस्तीग्रह मंचर येथील मुली आणि मंचर क्रिडासंकुलात ऊपस्थित महिलांचा सन्मान केला ज्यात प्रमिला खोंड,प्रियंका भागवत,निलम शिंगवेकर तसेच आवाज वार्ता च्या संपादिका शितल भगत यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या यावेळी सुरेखाताई निघोट यांनी महिलांनी आपलं कर्तुत्व सिद्ध केले असुन असेच कर्तव्य पार पाडत समाजात आपल्या कार्याचा ठसा ऊमटवत रहावा असे आवाहन करत महिला म्हणून कोणताही न्युनगंड न बाळगता समस्यांचा सामना करत जीवनाच्या लढाईत यशस्वी व्हावे अशी भावना महिला दिनानिमित्त व्यक्त केली.
यावेळी प्रा.सुरेखाताई निघोट यांच्यासमवेत प्रियंका भागवत,साधना भालेराव, मनिषा थोरात, त्रुप्ती पडवळ ऊपस्थित होत्या.
COMMENTS