प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर वढु तुळापूर दि.२ मार्च तालुका शिरुर -हवेली संपूर्ण विश्वातील हिंदुंचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांचा छावा...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
वढु तुळापूर दि.२ मार्च तालुका शिरुर -हवेली
संपूर्ण विश्वातील हिंदुंचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांचा छावा धर्मवीर संभाजी महाराज यांच्या २८ फेब्रुवारी ते २९ मार्च हा बलीदान मास म्हणुन पाळला जातो.या महान पराक्रमी विराची औरंगजेबानं फितुरांमार्फत पकडुन चाळीस दिवस क्रुर छळ करुन मराठयांच्या राजाची माणुसकीला लाजवेल अशा पाशवी पद्धतीने हत्या केली. अशा परमपवित्र संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी हजारो शंभुभक्त वढु येथे रक्तदान करून तर तुळापूर येथे साष्टांग दंडवत घालत होते.
या बलिदान मासानिमित्त राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्हयातील पदाधिकारी महाराजांपुढे नतमस्तक होण्यासाठी संस्थापक डॉ कृषिराज टकले, राष्ट्रीय अध्यक्ष स्वराज्य भुषण सागर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री निलेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र वढु आणि तुळापूर येथे आले होते, ज्यात पुणे जिल्हयाच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रा अनिल निघोट यांनी धर्मवीर संभाजी महाराजांना सर्वाबरोबर राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे वतीने सर्वांबरोबर शंभुराजांना अभिवादन केले. यावेळी ओंमराजे निंबाळकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवशंभुप्रिया जांभळे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा सुरेखाताई निघोट, ओमराजे निंबाळकर ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अलकाताई सोनवणे,मेघा ढमढेरे, तुळापुरचे सरपंच व राज्यसंघटक संतोष शिवले,पुणे जिल्हा संघटक मिराताई शिंदे, समाजसेविका मिनाताई संजय सातव, युवा आघाडी अध्यक्ष ज्योती सातव ,दत्ता देठे, ग्रा.पं.सदस्य संपत शिवले,पुणे जिल्हा समन्वयक वैशाली बहिरट व मान्यवर ऊपस्थित होते.
COMMENTS