पाटणा (बिहार): प्रेयसीचे लग्न ठरल्यानंतर तिला भेटायला बोलावले. दोघांनी काही वेळ चर्चा केल्यानंतर प्रियकराने तिच्यावर गोळी झाडली आणि नंतर स...
पाटणा (बिहार): प्रेयसीचे लग्न ठरल्यानंतर तिला भेटायला बोलावले. दोघांनी काही वेळ चर्चा केल्यानंतर प्रियकराने तिच्यावर गोळी झाडली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत दोघांचाही मृ्त्यू झाला असून, खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
राहुल (वय 24, रा. नंदे नगर, लखनौर पोलीस स्टेशन, मधुबनी) आणि अर्पिता उर्फ सुरभी (वय 20) अशी मृतांची नावे आहेत. सुरभी आणि राहुल लहानपणापासूनचे मित्र होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीचे लग्न कुटुंबीयांनी निश्चित केले होते. लग्न एप्रिलमध्ये होणार होते. घरात लग्नाची तयारी सुरू होती. बीसीए शिकत असलेल्या राहुलला याबाबत माहिती मिळताच तो संतापला होता. सुमारे दोन महिने तो त्याच्या गावी राहत होता. राहुलने शुक्रवारी वडिलांना कॉलेजला जायचे असल्याचे सांगितले. यानंतर तो सुरभीसह हाजीपूरहून घाट क्रमांक 93 वर पोहोचला. त्या ठिकाणी भेटण्यासाठी अर्पिता सुद्धा पोहोचली होती. काही वेळ दोघे बसले. कोल्ड्रीक्स सुद्धा घेतले. काही वेळानंतरराहुलने सोबत आणलेल्या गावठी कट्टा काढत अर्पिताला गतप्राण केले. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडली. दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
वैशालीच्या काझीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील धरहरा येथे राहणारी आहे. घाट क्रमांक 93 जवळील चेंजिंग रूमच्या पायऱ्यांवर रक्ताने माखलेले दोन्ही मृतदेह पडले होते. गोळी लागल्याने मुलगी पायऱ्यांवरून खाली कोसळली. राहुलचा मृतदेह पायऱ्यांवर पडलेला होता. मुलीच्या नाकाजवळ गोळी झाडण्यात आली. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
राहुल हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. तर सुरभी हाजीपूरच्या जमुनीलाल कॉलेजमध्ये शिकत होती. वडिलांनी सांगितले की, राहुलने एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे बोलला होता. तिला तिच्याशी लग्न करायचे आहे, असे सांगत होता. मी त्याला सांगितल की तुला हवं तिच्याशी लग्न कर. मला काही अडचण नाही. राहुलने शुक्रवारी वडिलांना कॉलेजला जायचे असल्याचे सांगितले. यानंतर तो सुरभीसह हाजीपूरहून घाट क्रमांक 93 वर पोहोचला. काही वेळ बसल्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर ही घटना घडली.
मुलीचा भाऊ सौरभने बहिणीचे प्रेमसंबंध नाकारले आहेत. तो म्हणाला की, ‘प्रेमसंबंधाबद्दल कोणतीही माहिती नव्हती. शुक्रवारी सकाळी बहीण कॉलेजला येत असल्याचे सांगून निघून गेली होती, ती पाटण्याला कशी आली याबाबत माहिती नाही. मुलीचे वडील विभूती सिंह यांचे 15 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांनी एक पिस्तूल, पिस्तुलात अडकवलेले काडतूस, बाहेर पडलेले काडतूस, राहुलची बॅग, जिवंत काडतुसे, राहुलचे आधारकार्ड, कॉलेजचे ओळखपत्र आणि दोघांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत.
COMMENTS