सांगली : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली मिरज रस्ता ते सिनर्जी हॉस्पिटल, हनुमान मंदिर ते एस. टी. वर्कशॉप ते कारंजा ते...
सांगली : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली मिरज रस्ता ते सिनर्जी हॉस्पिटल, हनुमान मंदिर ते एस. टी. वर्कशॉप ते कारंजा ते चिमणी रस्त्याचे लोकार्पण विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्याहस्ते झाले. त्यांच्या हस्ते रस्ता कामाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सुरेश खाडे, आमदार डॉ. विश्वजीत कदम, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, महानगरपालिका उपायुक्त रविकांत आडसूळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, समित कदम, डॉ. रवींद्र आरळी आदि उपस्थित होते.
या रस्ते सुधारणा कामासाठी रक्कम रूपये एक कोटी, ८३ लाख, २० हजार खर्च आला. या कामांतर्गत ७०० मीटर खडीकरण, एम. पी. एम. आदि कामे करण्यात आली.
COMMENTS