लखनौ (उत्तर प्रदेश): दोन सख्ख्या बहिणींनी व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन करून शारिरीक संबंधासाठी घरी बोलावले आणि व्यावसायिक संध्याकाळी घर...
लखनौ (उत्तर प्रदेश): दोन सख्ख्या बहिणींनी व्यावसायिकाला तब्बल 32 वेळा फोन करून शारिरीक संबंधासाठी घरी बोलावले आणि व्यावसायिक संध्याकाळी घरी पोहोचल्यानंतर त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना लखनौच्या दुबग्गा भागात घडली आहे.
या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींसह पाच आरोपींना अटक केली आहे.
रूप नारायण सोनी (वय 65, रा. डहाळा कुआन कॉलनी, चौक) असे हत्या झालेल्या सराफा व्यावसायिकाचे नाव आहे. डीसीपी विश्वजित श्रीवास्तव यांनी सांगितले की, गोलू (वय 20), विनय कुमार उर्फ छोटू (वय 19, रा. अत्रौली, हरदोई आणि हंसराज (वय 20, रा. मशीदा माल) यांना अटक करण्यात आली आहे. रूप नारायण सोनी याचा मुलगा नीलेशने सांगितले की, ते दुबग्गा विहार कॉलनीतील पवन ज्वेलरी दुकानात दागिने बनवून विकायचे. 18 मार्च रोजी सकाळी 10 वाजता रूप नारायण हे दुकानात जात असल्याचे सांगून घरातून निघून गेले होते. रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने 19 मार्च रोजी चौक पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली. सोमवारी घैला पुलाजवळ रूप नारायण यांचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी मुलाने रूप नारायणला ओळखले आणि हत्येचा गुन्हा दाखल केला.
रूप नारायण दागिने विकायचे आणि गहाण ठेवायचे. दुकानापासून 200 मीटर अंतरावर राहणाऱ्या महिलेने 24 डिसेंबर रोजी पैशांची गरज असल्याने तिचे दागिने गहाण ठेवले होते. त्या बदल्यात 65 हजार रुपये रोख मिळाले. ज्यावर 12 टक्के व्याज द्यावे लागणार होते. महिलेने एक महिन्याचे व्याज दिले. यानंतर पैशांअभावी ती व्याज देऊ शकली नाही. दोन महिने उलटल्यानंतर रूप नारायण या महिलेच्या घरी जाऊन गैरवर्तन करू लागला. महिला सापडली नाही तर तो तिच्या अल्पवयीन मुलींना अपशब्द वापरत होता. रूप नारायण याने अल्पवयीन बहिणींवर व्याजाच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. अल्पवयीन मुलीने विरोध केला तर तो तिच्यावर व्याजाने दबाव टाकून उलट बोलायचा. रूप नारायणला कंटाळून दोन्ही बहिणींनी आपल्या चुलत भावांना सांगितला.
पाचही जणांनी मिळून रूप नारायण याच्या हत्येची योजना आखली. योजनेनुसार दोन्ही बहिणींनी रूप नारायण याच्या सोबत संबंध ठेवण्यास सहमती दर्शवली. त्याला फोन करून घरी बोलावले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रूप नारायण दुकान बंद करून घरी आला. जिथे आधीपासून उपस्थित असलेल्या भावांसह त्यांना तासाभराने विटेने मारहाण करण्यात आली. यानंतर त्यांना त्यांच्या रुग्णवाहिकेतून आयआयएम रोड घैला पुलाकडे नेण्यात आले. जिथे त्याचा मृतदेह खाली फेकण्यात आला. अल्पवयीन मुलींनी त्यांच्या आईलाही हा संपूर्ण प्रकार कळू दिला नाही. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर आरोपी रात्री उशिरा दुकानाच्या चाव्या घेऊन दुकानात पोहोचले. तेथे त्यांनी शटर तोडून आत प्रवेश केला आणि नंतर सर्व दागिने घेऊन ते गायब झाले. मुलींना पाहून कुणालाही संशय आला नाही. आरोपीचा शोध घेत असतानाच पोलिस अल्पवयीन मुलींपर्यंत पोहोचले. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS