प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर आज दि ०४ मार्च २०२५ रोजी आदिवासी दुर्गम भागातील फांगळी ता.जुन्नर येथे डिसेंट फाउंडेशन पुणे आणि झेप फाउं...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
आज दि ०४ मार्च २०२५ रोजी आदिवासी दुर्गम भागातील फांगळी ता.जुन्नर येथे डिसेंट फाउंडेशन पुणे आणि झेप फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
यामध्ये शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, श्री हॉस्पिटल आळेफाटा यांच्या वतीने हृद्धायरोग ,मूत्ररोग व बीपी शुगर तसेच हिंद लॅब जुन्नर यांच्या वतीने रक्तातील विविध तपासण्या करण्यात आल्या. यावेळी ७८ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. तर १४ नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठविण्यात आले .
यावेळी डिसेंट फाउंडेशचे संस्थापक जितेंद्र बिडवई , झेप फाउंडेशचे संचालक रेश्मा सांबरे ,प्रसाद झावरे, डिसेंट चे सचिव डॉ.एफ.बी.आतार , संचालक आदिनाथ चव्हाण ,डॉ.दयानंद गायकवाड ,डॉ.प्रकाश टाले ,संतोष शिंदे ,कृष्णा रोकडे ,डॉ बामणे ,प्रयोगशाळा तज्ञ जोत्सना चतुर ,आशा सेविका अंगणवाडी सेविका आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी कष्ट घेतले .
COMMENTS