नागपूर: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानक परिसरात प्रवासी युवतीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना नागपुरात या घटनेची पुनरावृत्ती झाली आह...
नागपूर: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानक परिसरात प्रवासी युवतीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना नागपुरात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. एका बस चालकाने अकरावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
संदीप कदम (वय ४०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो नागपूर बसडेपोत चालक म्हणून काम करतो. पीडित युवती ही आरोपीच्या ओळखीची आहे. घटनेच्या दिवशी शनिवारी (ता. 22) पीडित मुलगी उमरखेड बस स्थानक परिसरात बसची वाट पाहत होती. यावेळी आरोपी चालक त्याठिकाणी आला. त्याने पीडितेला कुठे जायचंय, असे विचारलं. यावर तिने नांदेडला जायचे असल्याचे सांगितले.
आरोपीने तिला मी तुला नांदेडला सोडतो, असे सांगितले आणि तो तिला घेऊन नांदेडला गेला. रविवारी पहाटे तिला नांदेडहून नागपुरला घेऊन आला. पहाटे पाच वाजता नागपूरला बस पोहोचली. यानंतर तो पीडितेला आपल्या खोलीवर घेऊन गेला. याठिकाणी आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर नागपूर-सोलापूर या बसने तिला उमरखेडला सोडून दिले.
दरम्यान, मुलगी अचानक गायब झाली आणि रविवारी दिवसभर ती घरी न आल्याने तिचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याचे सांगितले. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता, पीडित मुलगी उमरखेड येथे आरोपी संदीप कदम याच्यासोबत दिसल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपीला उमरखेड बस स्थानकावरून अटक केली आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एसटी प्रशासनाने आरोपीला नोकरीवरून निलंबित केले आहे.
COMMENTS