बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा बिगूल वाजवून दिला आहे. आज त्य...
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा बिगूल वाजवून दिला आहे. आज त्यांच्या हस्ते कारखान्यातील परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे नुतनीकरण केले.
यावेळी कारखान्याचे संचालक मंडळासह अॅड. केशवराव जगताप देखील उपस्थित होते. यानंतर शेतकरी मेळाव्याला संबोधित करतांना त्यांनी विरोधकांवर जोरदार टिका करत पलटवार केला आहे.
माळेगाव कारखान्याचे प्रतिटन एकरकमी एफआरपीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून एफआरपी एकरकमी देण्याबाबतचा आदेश आल्यानंतर १ ते १५ मारच्या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे पेमेंट प्रतिटन ३१३२ रूपये एकरकमी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात आले. याचाच धागा पकडून अजित पवार यांनी विरोधकांनी शेतकरी मेळाव्यातून चांगलचं सुनावलं.
यावेळी ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याला तसेच आजूबाजूच्या परिसराला शोभा वाढलेली आहे. अँड केशवराव जगताप यांचं भाषण सुरू असतानाच मला अनेक जण चिट्ठ्या तसेच कागद, निवेदन देत होते. आपल्या साखर कारखान्याचा 2024 ते 2025 करीता गळीप हंगाम हा अकरा लाख एकवीस हजार मेट्रिक टनांपर्यंत गेला आहे. त्यातील रिकवरी रेट हा 1195 आहे.
साखर कारखान्याला भाव देत असताना इतरत्र बरीच चर्चा झाली. त्यावेळी संचालक आणि इतरांना सोबत घेऊन अकाऊंटला घेऊन किती पैसे आले आहेत. त्याचा हिशोब घेतला. त्यातून आपण कारखान्याला भाव देत असतांना पहिला अडव्हांन्स साठी आपण 2800 पुढे जात नव्हतो. त्याचे संपुर्ण आर्थिक व्यवहार पाहिला जातो. त्यानंतरच त्याबाबतचा निर्णय घेतला जातो. मी आतापर्यंत अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे मला थोडी तरी अक्कल आहे. असे म्हणत त्यांनी विरोधकांना सुनावलं.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, सगळ्यांचं सोंग करता येते, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. आपली आर्थिक परिस्थिती पाहून कारखान्याबद्दल निर्णय घेता येतो. आपण आपल्या संसार जसा चालवता तसाच येथीलही प्रपंच चालवावा लागतो. माळेगाव आणि सोमेश्वर साखर कारखान्याच्या परिसरातील सभासदांचा विचार करूनच आपण असे निर्णय घेत असतो.
COMMENTS