राज्याचं लक्ष लागून असलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. काल बीड जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी ...
राज्याचं लक्ष लागून असलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. काल बीड जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे उपस्थित होते.
मात्र, दुसरीकडे या प्रकरणात काल आरोपींनी पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब समोर आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गँगचा लिडर आरोपी सुदर्शन घुलेचा कबुली जबाब समोर आल्यानं अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत.
संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर त्यांची हत्या केल्याची आरोपी सुदर्शन घुलेने पोलिसांकडे कबुली दिली आहे. संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केल्याची आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनीही पोलिसांसमोर कबुली दिली. विश्वसनीय सुत्रांकडून ही महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता एका महत्वाच्या टप्प्यावर आलेलं आहे. तरी दुसरीकडे आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार असल्यानं, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर रोजी अपहरण करत निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले ला अटक झाल्यानंतर त्याने पोलीस कस्टडीमध्ये मीच अपहरण करून संतोष देशमुख यांचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. पोलिसांसमोर ही कबुली दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे. सुदर्शन घुले, प्रतील घुले, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे या प्रकरणातील आरोपी आहेत. त्यामुळे आता याप्रकरणात आणखी काय माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं असेल.
कोर्टात उज्वल निकम काय म्हणाले?
बीड जिल्हा न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज (26 मार्च) महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे देखील हजर होते. त्यांनी आपल्या युक्तिवादात काही महत्त्वाचे मुद्दे कोर्टासमोर मांडले. दरम्यान, यावेळी त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट कोर्टाला सांगितली.
"9 डिसेंबर 2024 दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुख केज बीड रोडवर उमरी फाटा टोल नाका येथून अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. किती क्रूर पद्धतीने मारले याचे फोटो आणि व्हिडिओ यातून दिसत आहे. आरोपी यावेळी हसून आनंद घेत होते. आमचे काही होऊ शकत नाही. आमच्यावर यापूर्वीही केसेस आहेत अशा धारणा होत्या. चार्ज फ्रेमसाठी ही केस तयार आहे" असा तब्बल 32 मिनिटं युक्तिवाद उज्वल निकम यांनी केला.
COMMENTS