शिक्षण घेतल्यामुळेच माणूस वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेऊ शकतो, पण हे शिक्षण घेण्याचे अधिकार संविधानामुळेच तुम्हाला मिळाले असे मत स...
शिक्षण घेतल्यामुळेच माणूस वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेऊ शकतो, पण हे शिक्षण घेण्याचे अधिकार संविधानामुळेच तुम्हाला मिळाले असे मत संविधान प्रसारक आणि आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी (केसे) या ठिकाणी शासनाच्या हर घर संविधान या कार्यक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विश्वास मोहिते यांनी संविधानाबद्दल माहिती देताना शिक्षण, बोलण्याचे, लिहिण्याचे तसेच इतर मूलभूत अधिकार हे संविधानानेच मिळाले असल्याचे सविस्तर मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुपने केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख धायगुडेसर होते. यावेळी आदर्शमाता कांताबाई मोहिते, शाळेचे मुख्याध्यापक चांदसाब संदे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षिका उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना विश्वास मोहिते म्हणाले, शाळेतील सर्व शिक्षकांनी भौतिक सुविधा गुणवत्तात्मक वाढीवर केंद्रित केलेले लक्ष अतिशय कौतुकास्पद असून त्यांच्या या उपक्रमशील ज्ञानदानामुळे या शाळेतील विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये आपल्या शाळेचे नाव तालुका स्तरावर पोहोचवीत आहेत. ही खरंतर अभिमानाची बाब असून अशा गुरुजन वर्गांच्या पाठीवर थाप ग्रामस्थांनी टाकणे ही गरजेचे आहे.
यावेळी केंद्रप्रमुख धायगुडेसर म्हणाले, जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थी विश्वास मोहिते यांची समाजाप्रती सेवा करण्याची प्रामाणिक मानसिकता खरंच कोणत्याही तराजूमध्ये तुलना करता येणार नाही. आणि खऱ्या अर्थाने हीच श्रीमंती माणसाकडे असणे गरजेचे आहे. विश्वास मोहिते यांच्या सकारात्मक भूमिकेचा आदर्श इतरांनी घ्यावा. असे सांगून धायगुडी सर म्हणाले, शाळेतील उपक्रमशील शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता विषयक चाचणी वरून या शाळेचे विद्यार्थी शाळेचे नाव चमकवतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
स्वागत आणि प्रास्ताविकामध्ये शाळेचे मुख्याध्यापक चांदसाहब संदे म्हणाले, आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करीत असून स्थानिक नागरिकांनी आणि पालकांनीही आमच्या सोबत राहावे असे आवाहन केले.
आभार साठे सर यांनी मांनले.
COMMENTS