प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर वडगावपीर ,आंबेगाव तालुक्याच्या पुर्व पट्टयातील पीरसाहेब बाबांची भव्य यात्रा भरणारे गाव, शेकडोंच्या संख्येने ...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
वडगावपीर ,आंबेगाव तालुक्याच्या पुर्व पट्टयातील पीरसाहेब बाबांची भव्य यात्रा भरणारे गाव, शेकडोंच्या संख्येने दुकाने,हॉटेल, ऊंच पाळणे,शेकडो बैलगाडे आणि हजारोंची ऊपस्थिती, पैपाहुणे, मुंबई पुणेकर आणि वाजतगाजत भाविक भक्तांचि शेरणि,नैवेद्य दिवे,नवस फेडायला आलेले भक्त,संदल आणि भव्य बैलगाडा शर्यतींचा थरार अशा विविधतेनं भरलेली म्हणजे वडगावपीर चि पिरसाहेब यात्रा होय. यात्रेस स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट, पुणे जिल्हा स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हाप्रमुख प्राध्यापक अनिल निघोट यांचा बैलगाडा शर्यत कमिटी व पिरसाहेब यात्रा कमिटीकडुन सत्कार करण्यात आला. यात्रेस आशाताई गवळी, विजय गवळी, सुनील आदक, जमादार, चेअरमन नाथा सुक्रे,चेअरमन संतोष सुक्रे, प्रसिद्ध बेलगाडामालक परमेश्वर चौधरि ऊपस्थित होते .
यात्रेनिमित्त१७५ बैलगाडा मालक सहभागी झाले ज्यात प्रथम क्रमांकात सत्तावन्न , द्वितीय क्रमांकात चौसष्ट तर त्रुतिय क्रमांकात अठ्ठाविस बैलगाडे सहभागी झाले ज्यात फायनल ला बैलगाडे सहभागी झाले ज्यात प्रमोद पोखरकर, होले सभापति,वसंतशेठ पडवळ, हेमंतकुमार पोखरकर, परमेश्वर चौधरि,पोपट आदक, रविंद्र गुळवे,यांचा समावेश होता.
बैलगाडा शर्यतीचि व्यवस्था यात्रा कमेटी अध्यक्ष सावळेराम आदक,व सोसायटिचे चेअरमन पोपट राजगुडे, सरपंच संजय पोखरकर ,सुनील आदक, योगेश आदक, विशाल साबळे ,विजय आदक, विकास आदक,विश्वनाथ आदक, अरुण पोखरकर यांनी पाहिलि, तर पिरसाहेब यात्रा व्यवस्था हनिफ मुजावर,मस्जिद मुजावर,मुबिन मुजावर,अमिन मुजावर व ग्रामस्थांनी पाहिलि.
आपल्या पहाडी आवाजाने माऊली मुळे,सुनील मोरवे,पोपट शिंगाडे, संतोष ढोकले,अण्णा जाधव, बाळासाहेब शेळके यांनी बैलगाडा शर्यतींचे समालोचन करुन रसिकांची मने जिंकली.
COMMENTS