पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार भाजपच्या तीन, राष्...
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार भाजपच्या तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एक आणि शिवसेना शिंदे गटाच्या एक आमदारासाठी ही निवडणूक पार पडणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतुन अनेक जण इच्छुक आहेत. मात्र यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून कोणाची वर्णी लागते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांची राजकीय कारकीर्द पाहता 1992 पासून चंद्रकांत रघुवंशी हे काँग्रेस पक्षात सक्रीय होते. तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य होऊन धुळे व नंदुरबार जिल्हा एकत्रित असताना सहा वर्षे धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होते.त्यानंतर सलग तीनवेळा ते विधानपरिषदेचे सदस्य होते. दरम्यान त्यांची आमदारकीची मुदत एप्रिल 2022 मध्ये पूर्ण होणार होती. मात्र तत्पूर्वीच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि ऑक्टोबर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.त्यानंतर जुलै 2022 रोजी त्यांनी एकनाथ यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांना संधी देण्यात येणार आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला विधानपरिषदेची एक जागा आली आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलेला शब्द पाळणार अशी पक्षात चर्चा रंगली आहे.
COMMENTS