मुंबई : सावत्र वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून युवतीने शारिरीक संबंधादरम्यान गुप्तांगावर वार केल्याची घटना नालासोपारा येथे घड...
मुंबई : सावत्र वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून युवतीने शारिरीक संबंधादरम्यान गुप्तांगावर वार केल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थली धाव घेतली आणि युवतीला ताब्यात घेतले.
सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील कारवाई केली जात आहे.
सावत्र बापाकडून वारंवार होणारे अत्याचाराला कंटाळून युवतीने सावत्र बापावर चाकूने हल्ला करत त्याला जखमी केले आहे. या मुलीने तिच्या सावत्र बापाच्या गुप्तांगावर आणि संपूर्ण शरीरावर चाकूने वार केले आहेत. या घटनेत आरोपी बाप गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नालासोपारा पूर्वच्या बावशेत पाडा परिसरात ही घटना घडली आहे. सावत्र बापाने आपल्यासोबत दुष्कर्म केल्याचा आरोप त्या तरुणीने केला आहे. त्यामुळेच संतापलेल्या मुलीने चाकूने सावत्र बापाच्या शरीरावर आणि गुप्तांगावर वार करून त्याला जखमी केल्याचे युवतीने सांगितले.
तुळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने दुसरं लग्न केले आहे. तिचे सावत्र वडील रमेश भारती हे दोन वर्षापासून तिच्यावर अत्याचार करत होते. सोमवारी देखील त्यांनी तिच्यावर शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला होता. त्यानंतर तिने हल्ला करण्याचं ठरवले. शरीरसंबंध ठेवण्यासाठी लाज वाटते, असे सांगून तिने तिच्या वडिलांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. त्यानंतर तिने अचानक हल्ला केला.
रक्तबंबाळ अवस्थेत सावत्र बाप घराबाहेर पडला. तेव्हा तिने रस्त्यात गाठून पुन्हा वार केले. माझ्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याने मी त्यांच्यावर हल्ला केला, असे तिने नागरिकांना सांगितले. तुळींज पोलिसांनी युवतीला ताब्यात घेतले आहे, त्याचबरोबर ते पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये युवतीच्या हातात चाकू दिसत असून तिचा बाप समोर रक्तबंबाळ होऊन पडला आहे. यावेळी जमलेले नागरिक त्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. तू हातातला चाकू फेकून दे, पोलिस तुला न्याय देतील असे त्या मुलीला सांगताना नागरिक दिसत आहेत. यानंतर त्या मुलीने चाकू फेकून दिला आणि नंतर जमलेल्या नागरिकांनी त्या आरोपी बापाला रुग्णालयात दाखल केले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS