सोलापूर : पुर्वी भारतात महिलांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती तेव्हा महिलांच्या जीवनात असंख्य बंधने होती. अज्ञानामुळे त्या अन्यायाचा प्रत...
सोलापूर : पुर्वी भारतात महिलांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती तेव्हा महिलांच्या जीवनात असंख्य बंधने होती. अज्ञानामुळे त्या अन्यायाचा प्रतिकार करू शकत नव्हत्या. तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा १ जानेवारी १८४८ ला काढली. त्यांनी स्वतः च्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका बनवून मुलींना शिकविण्यासाठी पाठवले. हिच क्रांतीची पहिली मशाल होती. समाजाकडून त्यांना खूप विरोध झाला परंतु कोणालाही न जुमानता या उभयतांनी त्यांचे कार्य सुरूच ठेवले. समाजात सर्व जातीधर्माच्या मुला मुलींना त्यांनी शाळेत शिकवून नवीन आशेचा किरण दाखवला. तेव्हा पासून समाजात हळूहळू का होईना वैचारिक परिवर्तन होण्यास सुरुवात झाली.
यावेळी परिवर्तनाची मशाल- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या विषयावर काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक कवी/कवयित्री सहभागी झाले होते. "सम्यक दर्शन साहित्य राज्यस्तरीय मंच" यांचे तर्फे आठवडी काव्यलेखन स्पर्धा क्र.२३ ही १४ मार्च २०२५ ते १८ मार्च २०२५ या दरम्यान घेण्यात आली होती. या काव्यलेखन स्पर्धेत यावेळी, "महाराष्ट्राचा उत्कृष्ट कवी" म्हणून मा. शब्दस्वरा मंगरूळकर,पुणे हे विजयी ठरले आहेत.
फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांच्या विचारसरणीवर आधारित त्यांचे साहित्य असून त्यांनी प्रबोधनात्मक विचार त्यांच्या लिखाणात मांडले आहेत. ते अनेक साहित्य समूहातून लेखन करीत आहेत. आजवर अनेक पुरस्कार व आॅनलाईन सन्मानपत्र त्यांनी प्राप्त केले आहेत.
या स्पर्धेत महाराष्ट्राची उत्कृष्ट कवयित्रीचा सन्मान कवयित्री सौ. सुनिता पडवळ, पुणे यांनी मिळवला.
त्या जिजाऊ ब्रिगेड संस्थेच्या सदस्य असून व्याख्यानाद्वारे सामाजिक कार्य करीत आहेत. त्यांचे अनेक साहित्य समूहात काव्यलेखन सुरू असून आजवर अनेक साहित्य सन्मान मिळाले आहेत. आजवर अनेक आँनलाईन पुरस्कार त्यांना मिळाले असून सर्व श्रेणीतील विजेता सन्मान सुद्धा मिळाला आहे.
विजेत्या कवींचे समूहाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व भविष्यकालीन वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
सम्यक दर्शन साहित्य समूहाचे संस्थापक देविदास गायकवाड तसेच सौ.सुनिता तागवान हे आहेत तसेच सुजाता उके ह्या प्रशासिका आहेत. या समूहात प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक आठवड्यात एक कवी व एक कवयित्री यांना हा सन्मान दिला जातो. तेव्हा पुढील स्पर्धांमध्ये साहित्यिकांनी सातत्याने सहभागी होत रहावे असे आवाहन समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS